काहीशा चवीला वेगळ्या असणा-या शेपूच्या भाजीला इंग्रजीत दिल व्हेजिटेबल, तर हिंदीत सावा आणि पंजाबीत सोया असं म्हणतात.
काहीशा चवीला वेगळ्या असणा-या शेपूच्या भाजीला इंग्रजीत दिल व्हेजिटेबल, तर हिंदीत सावा आणि पंजाबीत सोया असं म्हणतात.
या भाजीची लागवड भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या आणि उबदार वातावरणात होते. या भाजीची उंची साधारण एक मीटपर्यंत वाढते. या भाजीचा वापर भारताप्रमाणेच रशिया, युक्रेन, पोलंड यांसारख्या देशांतही केला जातो. दिसायला हिरवीगार असल्याने कोथिंबिरीच्या गटात मोडते.
मात्र हिची चव कोथिंबिरीप्रमाणे नसते तर हिला एक विशिष्ट उग्र चव असते. चवीला चांगली नसली तरी हिच्यात भरपूर औषधी गुण आहेत. इतर देशात या भाजीचा वापर सलाड, सूप यांसारख्या विशिष्ट पदार्थात केला जातो तर आपल्याकडे प्रामुख्याने भाजी आणि पराठा करून खाल्ली जाते. अशा या शेपूचे औषधी गुणधर्म जाणून घेऊ या.
» पोटाचे विकार, डोकेदुखी, किडणीचे विकार यासारख्या रोगांवर अतिशय उपयोगी आहे.
» शेपूच्या भाजीमध्ये लो कॅलरीज आणि उच्च प्रतीची पोषणमूल्य असतात.
» शेपूची पानं भाजलेल्या भागावर लावली तर लवकर आराम पडतो.
» या भाजीच्या सेवनाने कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. म्हणून ही भाजी आहारात असावी.
» या भाजीच्या सेवनाने पचनशक्ती वाढवण्यास मदत होते.
» शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
» बी कॉम्प्लेक्स अािण व्हिटॅमिनचं प्रमाण अधिक असल्याने या भाजीच्या सेवनाने निद्रानाशाचा त्रास होत नाही.
» शरीरातील हार्मोन्स संतुलन राखण्यास मदत होते.
» मासिक पाळीचा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. यात असलेले फ्लेवनॉइड्स आणि पोषक मूल्यांमुळे मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास कमी होतो.
» शरीरातील रक्तातल्या व्हाईट कॉलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे हृदय संरक्षक म्हणून काम करते.
» यात कॅल्शिअम अधिक प्रमाणात मिळतं. त्यामुळे गुडघेदुखी कमी होते. तसंच हाडांची झीज टाळण्यासाठी हाडं मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो.
शेपूची भाजी साठी बियाणे काय वापरायचे.