लैंगिक चाळे करणा-या सावत्र पित्याची आईकडे तक्रार केल्यानंतरही तिचा विश्वास बसत नसल्याने अखेरीस या मुलीला सावत्र पित्याच्या या चाळयांचे स्टिंग ऑपरेशनच करावे लागले.
कल्याण- लैंगिक चाळे करणा-या सावत्र पित्याची आईकडे तक्रार केल्यानंतरही तिचा विश्वास बसत नसल्याने अखेरीस या मुलीला सावत्र पित्याच्या या चाळयांचे स्टिंग ऑपरेशनच करावे लागले. हे चित्रीकरण पाहून आईचा विश्वास बसला आणि तक्रार पोलिसात गेली. ही घटना आहे, कल्याण रहेजा गृहसंकुलातील. पोलिसांनीही तक्रारीनंतर शमशुद्दीन निप्पलवाला याला अटक करून न्यायालयात हजर केले. तूर्तास न्यायालयाने त्याला जामीन नाकारला असून, पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार आहे.
कल्याण येथील रहेजा गृहसंकुलात राहणा-या शमुद्दीनने १४ वर्षापूर्वी एका महिलेशी लग्न केले होते. या महिलेच्या मुलीसह शमशुद्दीनने तिचा स्वीकार केला हेाता. या महिलेला त्याने कल्याण पूर्वेतील एका इमारतीत घर घेऊन दिले होते. शमसुद्दीनची पत्नी डीटीपीचे काम करते. ती सकाळी कामावर गेल्यानंतर संध्याकाळी घरी परतते.
दरम्यानच्या काळात शमसुद्दीन घरी जाऊन मुलीशी लैंगिक चाळे करत असे. या संदर्भात तिने आईकडे अनेक वेळा तक्रार केली होती, मात्र आईचा तिच्यावर विश्वास बसत नव्हता. मुलीने आत्महत्या करण्याची धमकी तिच्या आईला दिली होती. तशी चिठ्ठीही तिने लिहिली होती, मात्र आई विश्वास ठेवायला तयार नसल्याने तिने स्वत:च्या मोबाइलमधून पित्याच्या लैंगिक चाळेच चित्रित करून आईला दाखवले. मात्र अटकेच्या भीतीपोटी शमसुद्दीनने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
एक दम फालतू न्यूज, !