काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी ‘नमाजासाठी अजान महत्वाची, भोंगे नाही’, अशी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई- सुप्रसिद्ध गायक सोनू निगमच्या अजान आणि भोंग्यांच्या ट्विटवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी ‘नमाजासाठी अजान महत्वाची, भोंगे नाही’, अशी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
अजान आणि भोंग्यांवर आक्षेप नोंदवत वादग्रस्त ट्विट करणारा गायक सोनू निगमने आपण आजही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा ‘भोंगे’ या विषयावर सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
सोनू निगमने केलेल्या ‘मी मुस्लीम नाही, तरी अजानमुळे माझी झोपमोड का?’ या ट्विटवर ‘नमाज अदा करण्यासाठी अजानाची गरज आहे. परंतू या आधुनिक युगात नमाजासाठी भोंग्यांची आवश्यकता नाही’, असे परखड मत पटेल यांनी मांडले आहे.
यावर ‘समजूतदार व्यक्ती अशा प्रकारे मुद्दा समजून घेतात. तुमचा आदर आहे अहमद पटेल जी. अजान किंवा आरतीचा नाही तर हा मुद्दा भोंग्याचा आहे,’ अशी प्रतिक्रिया सोनूने दिली आहे.
त्याच्या या ट्विटनंतर मशिदीवरील भोंग्यांबाबत देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कुणी सोनूवर टीकेची तोफ डागली आहे, तर कुणी स्पष्ट बोलल्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी मात्र तटस्थपणे आपले मत व्यक्त केले आहे.
[EPSB]
मशिदींवरच्या भोंग्याविरोधात सोनू निगमचे सूर
मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात सगळेच सावध पवित्रा घेत असताना, बॉलिवूडमधील गोड गळ्याचा गायक सोनू निगमने ‘अझान’विरोधात अप्रत्यक्षपणे निषेधाचा सूर छेडला आहे.
[/EPSB]
Azaan is an essential ingredient for Namaz. In today's day of modern technology, loudspeakers aren't
— Ahmed Patel (@ahmedpatel) April 18, 2017
Dear everyone. Your stand exposes your own IQ. I stand by my statement that loudspeakers should not be allowed in Mosques & Temples. Period
— Sonu Nigam (@sonunigam) April 18, 2017
Gundagardi hai bus…
— Sonu Nigam (@sonunigam) April 17, 2017
I don't believe in any temple or gurudwara using electricity To wake up people who don't follow the religion . Why then..? Honest? True?
— Sonu Nigam (@sonunigam) April 17, 2017
And by the way Mohammed did not have electricity when he made Islam.. Why do I have to have this cacophony after Edison?
— Sonu Nigam (@sonunigam) April 17, 2017
God bless everyone. I'm not a Muslim and I have to be woken up by the Azaan in the morning. When will this forced religiousness end in India
— Sonu Nigam (@sonunigam) April 16, 2017
U r spot on @SonuNigam. Thank God there is at least 1 person in India who has the courage to stare down mullah bullying. Shut the 4AM Azaan https://t.co/yVdliZzAUn
— Tarek Fatah (@TarekFatah) April 17, 2017
अजान चालू ठेवा पण ते भोंगे ,लाऊडस्पीकर पहिले थांबवा….