सचिन तेंडुलकरच्या दोनशेव्या कसोटी सामन्याची ऑनलाईन तिकीट विक्री करणारे www. kyazoonga.com संकेतस्थळ क्रॅश झाले आहे. .
मुंबई – कारर्कीदीतील अखेरचा कसोटी सामना खेळणा-या सचिन तेंडुलकरच्या दोनशेव्या कसोटी सामन्याची ऑनलाईन तिकीट विक्री करणारे www. kyazoonga.com संकेतस्थळ क्रॅश झाले आहे.
इंटरनेटवरुन तिकीटांची ऑनलाईन बुकिंग करणा-यांना संकेतस्थळावर हॅग झाल्याचा संदेश येत आहे. सकाळी अकराला तिकीट विक्री सुरु झाल्यानंतर एकाचेळी हजारो लोक तिकीट खरेदीसाठी गेल्याने संकेतस्थळ क्रॅश झाले. लवकरच तिकीट विक्री पूर्ववत सुरु होईल असे संकेतस्थळाकडून सांगण्यात आले आहे.
तिकीट खरेदीसाठी सोमवारी सकाळी वानखेडे स्टेडियमबाहेरही चाहत्यांची गर्दी उसळली होती. सचिन तेंडुलकरला दिमाखदार निरोप देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोशिएशनने जय्यत तयारी केली आहे.तिकीट विक्रीपासून प्रत्येक बाबतीत वेगळेपण जपण्याचा एमसीएने प्रयत्न केला आहे. सचिनच्या दोनशेव्या सामन्याची ऑनलाईन तिकीटे kyazoonga.com या संकेतस्थळावर सोमवार सकाळपासून उपलब्ध होणार आहेत.
एमसीएने भारत-वेस्टइंडिज दुस-या कसोटीचे प्रत्येक दिवसाचे तिकीट क्रिकेटरसिकांना सचिनच्या विक्रमी कारर्कीदीची माहिती मिळेल अशा खास पद्धतीने तयार केले आहे. पाचही दिवसाच्या तिकिटांवर सचिनची वेगवेगळी शैलीदार फटके खेळतानाची छायाचित्रे असून, त्यावर सचिनची स्वाक्षरी आहे. या तिकीटावर वानखेडे स्टेडियमचे छायाचित्रही असून, एमसीएचा लोगो आहे. सचिनच्या कारकिर्दीतील पहिला, ५०वा, १००वा, १५०वा आणि २००वा सामना, प्रतिस्पर्धी संघ, दिनांक, स्थळी ही माहितीही नमूद करण्यात आली आहे.”
ऑनलाईन प्रत्येकी दोन तिकीटे बुक करता येणार असून, पाचशे, एकहजार आणि अडीचहजार असे या तिकिटांचे दर आहे. क्याझुंगा संकेतस्थळाचा ऑनलाईन तिकिटविक्रीचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड असल्याने त्यांची निवड करण्यात आली असे एमसीएचे सहसचिव नितीन दलाल यांनी सांगितले. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूचे निवृत्तीचे क्षण डोळयात साठवून घेण्यासाठी तिकीटांना मोठया प्रमाणात मागणी आहे. जास्तीत जास्त क्रिकेटरसिकांना तिकीटे उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे दलाल यांनी सांगितले.
sarvat vait to divas javal yet chalala tas kaljat dhaddhad hot chalali