राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी सकाळी नवी दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी चालण्याचा व्यायाम करत असताना पाय घसरुन पडले.
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी सकाळी त्यांच्या नवी दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी चालण्याचा व्यायाम करत असताना भोवळ आल्याने पाय घसरुन पडले.
त्यांच्या पायाला दुखापत झाली असून, पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाय घसरुन पडल्यामुळे शरद पवार यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.
दिल्लीत प्राथमिक उपचार केल्यानंतर शरद पवारांना सकाळी ११.१५ वाजता विशेष हवाई रुग्णवाहिकेने मुंबईला आणण्यात आले. पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा आणि कन्या सुप्रिया सुळेही आहेत.
दरम्यान, शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोलापूरमधील दुष्काळी भागाचा नियोजित दौरा रद्द केला असून ते तातडीने मुंबईला पोहचले आहेत. रुग्णालयात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळही उपस्थित होते.
शरद पवारांचे वय ७३ असून, ते राज्यसभेवर खासदार आहेत. १९९९ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तीन वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले असून, तत्कालीन काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते कृषीमंत्री होते.
काय अपंगांबद्दल कळ-कळ आहे ,जागतिक अपंग दिनीच पाय मोडून घेतला…