अन्नातून विषबाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेले सुप्रसिध्द अभिनेते कमल हसन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
मुंबई – अन्नातून विषबाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेले सुप्रसिध्द अभिनेते कमल हसन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. बुधवारी त्यांनी रुग्णालयातून फोनवरुन बोलताना आता माझी प्रकृती उत्तम असून, चिंता करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले आहे.
काही जणांना या आजारपणातून नाटय शोधायचे होते. पण त्यांना निराशा केल्याबद्दल मी माफी मागतो. माझी तब्येत आता उत्तम आहे. ही एक साधी अन्नातून विषबाधेची घटना आहे. त्याने चिंता करण्याचे कारण नाही असे कमल हसन यांनी म्हटले आहे.
बुधवारी केरळमध्ये चित्रीकरण करत असताना, कमल हसन यांना अचानक त्रास सुरु झाला त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ज्या भागात चित्रीकरण सुरु आहे तिथे कुठेही खाण्या-पिण्याची चांगली व्यवस्था नाही. बहुतेकदा रस्त्यावरील ढाब्यावर जेवणे होते. दूषित पाणी प्याल्यामुळे मला त्रास झाला असावा. काही ठिकाणचे अन्न माझ्या प्रकृतीला मानवत नाही त्यामुळे मी रुग्णालयात आहे असे कमल हसन यांनी सांगितले.
God ब्लेस you ! My favorite Actor ,