आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी पत्रकार अमृता राय यांच्याशी संबंध असल्याचे जाहीर केले आहे.
नवी दिल्ली- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी पत्रकार अमृता राय यांच्याशी संबंध असल्याचे जाहीर केले आहे. सिंग यांनीच टि्वटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.
राय आणि आपले संबंध असल्याचे जाहीर करण्यात कोणताच संदेह नाही. राय आणि त्यांचे पती यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. घटस्फोटासंदर्भातील निर्णय झाल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ असे सिंग यांनी टि्वटरवर म्हटले आहे. तसेच हे आपले व्यक्तीगत आयुष्य असल्याचे सांगत यावर कोणीही अतिक्रमण करु नये असेही सिंग यांनी म्हटले आहे.
I have no hesitation in accepting my relationship with Amrita Rai. She and her husband have already filed a mutual consent divorce case.
— digvijaya singh (@digvijaya_28)
April 30, 2014
Once that is decided we would formalise it. But I do condemn encroachment in our private life.
— digvijaya singh (@digvijaya_28) April 30, 2014
सिंग यांच्या या टि्वटरनंतर खुद्द राय यांनीही याला दुजोरा दिला आहे. माझे पती आणि मी वेगळे झाले आहोत. यासंदर्भात घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. ती पूर्ण होताच मी दिग्विजय सिंग यांच्याशी विवाह करणार असल्याचे राय यांनी टि्वटरवर म्हटले आहे.
I have separated from my husband and we have filed a mutual consent divorce papers. After which I have decided to marry with Digvijaya Singh
— amrita rai (@amrritarai)
April 30, 2014
Congressche he ajun navin lafdebaaj leader, rahul gandhi he modi yanchya navane bote modat hote. aata hya divtayane kai dive lavale jara bagha. BOGUS CONGRESS.