‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटातून विद्या बालन हिने मराठी चित्रपटात प्रवेश केल्यानंतर आता सलमान खान रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटात भूमिका करणार आहे.
मुंबई- ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटातून विद्या बालन हिने मराठी चित्रपटात प्रवेश केल्यानंतर आता सलमान खान रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटात भूमिका करणार आहे.
याआधी रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ चित्रपटातील एका गाण्यात सलमान खानची झलक दिसली होती. यावेळी मात्र छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटात सलमान खान पाहुणे कलाकार म्हणून भूमिका करणार नसून एखादी व्यक्तिरेखा साकारणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा मराठीतील बिग बजेट चित्रपट असणार आहे.
सलमान तू माझा खूप आवडता हिरो आहेस
आणि तू ज्या भूमिकेत काम करशील ते खूप हिट होईल याची खातरी आहे बेस्ट luck सलमान