राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्वेता बसू प्रसाद हिला उच्चभ्रू वेश्या व्यवसायात सहभागी असल्याप्रकरणी अटक केली आहे.
हैदराबाद- ‘मकडी’ या चित्रपटातील अभिनयासाठी २००२मध्ये सर्वोत्त्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्वेता बसू प्रसाद हिला उच्चभ्रू वेश्या व्यवसायात सहभागी असल्याप्रकरणी अटक केली आहे.
हैदराबाद पोलिसांनी शहरातील ‘बंजारा हिल्स’ या उच्चभ्रू परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकला तेव्हा श्वेताला अटक केल्याचे वृत्त आहे. श्वेतावर वेश्या व्यवसायात सहभागी असल्याच आरोप ठेवल्याचे समजते. दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये आपण पैशासाठी केल्याचे श्वेताने म्हटले आहे. पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत अन्य सात जणांना अटक केली आहे.
श्वेताला ‘मकडी’ या चित्रपटातील अभिनयामुळे स्वतंत्र ओळख मिळाली होती. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. याशिवाय ‘इकबाल’ या चित्रपटात तीने काम केले आहे. तसेच एकता कपूरच्या ‘कहानी घर घर की’ या टिव्हीमालिकेत तीने भूमिका केली आहे.
चामडी है तो दमडी है !