जम्मू जिल्ह्यातील आर.एस.पुरा. सेक्टरमधील तावी भागात रविवारी पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला.
जम्मू – जम्मू जिल्ह्यातील आर.एस.पुरा. सेक्टरमधील तावी भागात रविवारी पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला.
सकाळी अकरा वाजल्यापासून त्यांनी लहान शस्त्रांच्या सहाय्याने गोळीबार केला. गेल्या २४ तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही दुसरी वेळ आहे. अशी माहिती बीएसएफच्या वरिष्ठ अधिका-यांनी यावेळी दिली.
शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने आर.एस.पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा मारा केला होता. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नव्हती. तसेच पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन काही घुसखोर भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र भारतीय सैन्याने त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले.
एकदाच कायमचे संपवून टाका ना पाकिस्तानला. जयहिंद जय महाराष्ट्र.