शरीरसौष्ठवपटू आणि पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकर याला मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पनवेल– शरीरसौष्ठवपटू आणि पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकर याला मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. खामकर याला सोमवारी पन्नास हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.
एका सातबा-यावर नाव चढवण्यासाठी खामकर याने ५० हजारांची लाच मागितली होती. ती घेण्यासाठी त्याने त्याचा सहकारी गणेश भोगाडे याला पाठवले होते. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी भोगाडे याला ताब्यात घेतल्यावर हे प्रकरण उघड झाले.
यासाठी घेतली लाच…
या प्रकरणातील तक्रारदार पनवेलमधील कोयनावेंळे येथील जमीन मालकाकडे नोकरीला आहे. त्याच्या मालकाने पेंधर आणि कोयनावेंळेतील जमीन खारघरमधील शरद सावंत यांना ७ सप्टेंबर २०१३ रोजी विकली होती. या जमिनीच्या सातबा-यावर जमीन विकत घेणा-या मालकाची नोंद होण्यासाठी कदम यांनी पेंधरच्या तलाठयांकडे गेल्या वर्षी अर्ज केला होता. हे प्रकरण पेंधरच्या तलाठयांनी पनवेलच्या तहसीलदार कार्यालयात पाठवले होते. त्यामुळे तक्रारदार त्याच्या मालकासह तहसीलदार कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार सुहास खामकर यांना भेटले. ज्यांना जमीन विकली त्यांच्या नावाची नोंद करण्याची विनंती केली. त्या वेळी खामकर यांनी त्यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करून काही कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.
३० जुलै २०१४ रोजी तक्रारदाराच्या मालकाने पनवेल तहसील कार्यालयात तक्रारदाराला पाठवून नावाची नोंद झाली आहे की नाही, हे तपासण्यास सांगितले. त्या वेळी खामकर याने त्याचा सहकारी गणेश भोगाडे याला भेटावयास सांगितल्यानंतर त्याने लाचेची मागणी केली होती. खामकर याने सलग तीन वेळा ‘महाराष्ट्र श्री’ किताब पटकावण्याचा पराक्रम केला.
रिश्वत खोरीचा खोटा आरोप जर तुमच्यावर केला गेला असेल तर ,५० किलोचे डम्बेल्स त्यांच्या टाळक्यात घाला ,!!
करवीर वासिनी श्री, महालक्ष्मी च्या दरबारांत राहणारे तुम्ही ,खर काय ते आम्हाला सांगून टाका सुहास खामकर साहेब.!