माळीण गावाच्या पुनर्वसनासाठी सिध्दीविनायक मंदिर न्यासाने ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.
मुंबई- दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या आंबेगाव तालुक्यातील माळीण गावाच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील सिध्दीविनायक मंदिर न्यासाने ५० लाखांची मदत जाहीर केली आहे.
या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारतर्फे दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सध्या दुर्घटनास्थळी मदत कार्य युद्धपातळीवर सुरू असून पावसामुळे त्यात व्यत्यय येत आहे.
[EPSB]
माळीण दुर्घटना, पावसामुळे बचावकार्यात अडथळे
भीमाशंकरच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर बुधवारी पहाटे डोंगरकड्याच्या रुपाने काळाने घाला घातला आणि संपूर्ण गावच डोंगराखाली नाहीसे झाले.
माळीण गावावर डोंगरकडा कोसळला, २५ ठार
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावाचा बुधवारी पहाटे कोसळलेल्या डोंगरकडयाने घास घेतला असून साठ-सत्तर घरांसह सुमारे अनेक गावकरी या डोंगराच्या ढिगा-याखाली नाहीसे झाले आहेत.
[/EPSB]
श्री सिद्धीविनायकाचे कृपेने माळीन गाव पुन्हा उदयास येओ ! अशी प्रार्थना करूया ,!!