राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार नारायण राणे यांच्याशी राज्यातील विविध घटनांवर मनमोकळा संवाद साधण्याची नामी संधी प्रत्येकाला मिळणार आहे.
मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार नारायण राणे यांच्याशी राज्यातील विविध घटनांवर मनमोकळा संवाद साधण्याची नामी संधी प्रत्येकाला मिळणार आहे.
सोशल मीडिया फेसबुक ‘लाईव्ह चॅट’च्या माध्यमातून आज मंगळवारी ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नारायण राणे प्रत्येकाशी थेट संवाद साधणार आहेत.
राज्य सरकार शेतक-यांना न्याय देण्यात, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात तसेच रोजगारनिर्मिती वा गुंतवणूक वाढवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या अनुषंगाने ते फेसबुकच्या माध्यमातून जनतेच्या मनात दडलेल्या विविध प्रश्नांवर आपल्या नेहमीच्या भाषाशैलीत सडेतोड उत्तरे देणार आहेत.
तसेच राज्यातील इतर प्रश्नांबाबत ते जनतेशी संवाद साधणार आहेत. तेव्हा नारायण राणे यांच्याशी संवाद साधण्याची ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
Marathi