विराट लवकरच सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी करेल, असे बोलले जात असतांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मात्र सचिन आणि विराटच्या तुलनेवर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली यांच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. विराट लवकरच सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी करेल, असे बोलले जात असतांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मात्र सचिन आणि विराटच्या तुलनेवर नाराजी व्यक्त केली आहे.
विराट कोहलीने टी-२० विश्वचषकमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सध्या तो फॉर्ममध्ये आहे. त्याची कामगिरी पहाता तो सचिनच्या रेकॉर्डची बरोबर करेल अशा चर्चा सध्या सुरू आहेत. खुद्द सचिननेही एका कार्यक्रमात अशी बतावणी केली. पण लता मंगेशकर यांना सचिन तेंडूलकर आणि विराट कोहलीची ही तुलना आवडलेली नाही.
त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टवर ‘आज बातम्यांमध्ये क्रिकेटविषयी खूप काही सांगितले जात आहे, पण ते चांगले नाही,’ अशी पोस्ट केली आहे.
‘विराटचे भविष्य उज्ज्वल आहे यात कोणती शंका नाही. मात्र सचिनची तुलना कोणाबरोबरही करणे योग्य नाही. दोन्ही खेळाडू त्यांच्या स्थानी श्रेष्ठच आहेत,’ असे लता मंगेशकर म्हणाल्या आहेत.
Namaskar.Aaj news mein cricket ke baare mein bahut kuch bataya ja raha hai,ye acchi baat hai (cont) https://t.co/ThfFQOhRQK
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) March 31, 2016
जाउ द्या ना दीदी जी ,khel aahe to ! Khela madhye kunitari swatache varchaswa dakhvinyace prayatna karnarach,