रशीद मसूद यांनी मंगळवारी वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचारप्रकरणी झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.
नवी दिल्ली – राज्यसभेची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर कॉँग्रेस नेते रशीद मसूद यांनी मंगळवारी वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचारप्रकरणी झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.
रशीद मसूद यांना मधुमेहाचा त्रास असून, त्यांना दिवसातून अनेक वेळा इन्सुलिन घ्यावे लागत असल्याचे याचिकेत नमूद करत मसूद यांचे वकील एच. आर. खान यांनी त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळावी अशी मागणी केली. दरम्यान, या प्रकरणी न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी सीबीआयला १३ नोव्हेंबपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
आरोग्य मंत्री असताना मसूद यांनी त्रिपुरा येथील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रवेशामध्ये भ्रष्टाचार केला होता. या प्रकरणी सत्र न्यायालाने त्यांना चार वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
in india its normal 4Mantri 2make money in wrong way even they will sell 4Money there own loveble persone