बिगबॉस या रियलिटी कार्यक्रमात ब्रिटीश-पाकिस्तानी अभिनेत्री सोफिया हयातला मारहाण केल्या प्रकरणी अटक केलेल्या अरमान कोहलीला जामीन मंजूर झाला आहे.
मुंबई –बिगबॉस या रियलिटी कार्यक्रमात ब्रिटीश-पाकिस्तानी अभिनेत्री सोफिया हयातला मारहाण केल्या प्रकरणी अटक केलेल्या अरमान कोहलीला जामीन मंजूर झाला आहे. ५० हजाराच्या जातमुचलक्यावर त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला.
बिगबॉस या रियलिटी कार्यक्रमात ब्रिटीश-पाकिस्तानी अभिनेत्री सोफिया हयातला मारहाण केल्या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा अभिनेता अरमान कोहलीला अटक केली होती. कोहलीला लोणावळयातील बिगबॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती.
अकरा डिसेंबरला बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सोफिया हयातने सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये कोहली विरोधात तक्रार केली होती. बिग बॉसच्या घरात कोहलीने आपल्याला मारहाण केली तसेच असभ्य भाषा वापरल्याचा आरोप तिने तक्रारीत केला होता. बिग बॉसचे हे सातवे पर्व असून, बिग बॉसच्या घरातल्या भांडणांसाठी स्पर्धकाला पोलिसांकडून अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवरल्यानंतर पोलिसांनी ही तक्रार लोणावळा पोलिसांकडे हस्तांतरीत केली. कारण गुन्हा त्या हद्दीत घडला होता. लोणावळा पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास करुन कोहलीला अटक केली होती.
अरमान कोहली विरोधात ३२४,५०४, ५०९ (विनयभंग), ५०६, ३५४ (लैंगिक छळ) या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. बिग बॉसच्या घरात सोफियाचे तनिषा, अयाझ खान या सहस्पर्धकांबरोबरही भांडण झाले होते. मात्र अरमान बरोबरच्या भांडणात धक्काबुकी आणि मारहण झाली होती. या वादानंतर सोफियाने बिग बॉसकडे अरमानला घरातून काढून टाकण्याचीही मागणी केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर सोफियाने टि्वटरवरुन सांताक्रूझ पोलिसांचे आभार मानले होते.
Arman kohli is BIGG BOSH winner and there is put douwn to him but he is stron man and sophia hayat is mad girl.