‘अमर चित्रकथा’ हे नाव बालविश्वाला सुपरिचित आहे. या प्रकाशनाने मुलांसाठी आजवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.कान्स पुरस्कार विजेत्या गितांजली राव यांनी या गोष्टीला कार्टुनच्या स्वरूपात तयार केले आहे.
‘अमर चित्रकथा’ हे नाव बालविश्वाला सुपरिचित आहे. या प्रकाशनाने मुलांसाठी आजवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. पण हल्ली ‘मोबाइलसॅव्ही’ झालेले आपले छोटे दोस्त पुस्तकं वाचायचा काहीसा कंटाळा करतात, हो ना? यावर उपाय म्हणून ‘अमर चित्रकथा प्रा. लि.’ यांनी रामायण कथा आता आणली आहे ती चक्क ‘ऑडिओ बुक्स’च्या रूपात. हनुमान आपल्याला ही रामायणाची कथा सांगणार आहे. कान्स पुरस्कार विजेत्या गितांजली राव यांनी या गोष्टीला कार्टुनच्या स्वरूपात तयार केले आहे. पाथरे गुप्ते याने हनुमानाच्या व्यक्तिरेखेला आवाज दिला आहे तर दीपा बल्सावर यांनी रामायणाची ही जुनी गोष्ट लहान मुलांकरता रंजकपणे पुन्हा एकदा नव्याने सांगितली आहे. आयओएस ४.३ किंवा यापुढील सॉफ्टवेअरच्या फोन्समध्ये मुलांना या अॅप्लिकेशनचा आनंद घेता येऊ शकेल. यात बच्चेकंपनी हनुमानाला आकाशात भरारी मारायला लावू शकते, रावणाचं पुष्पक विमान उडवू शकते आणि सीतेचे चमकणारे दागिनेसुद्धा गोळा करू शकते! काय मग, ‘रामायणकथे’मध्ये रंगून जायला तुम्ही तयार आहात?
Congratulations to Mrs.Gitanjali Rao.