आगामी लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी वाराणसीमधून मोंदींविरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सोमवारी स्पष्ट केले.
भोपाळ – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी वाराणसीमधून मोंदींविरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सोमवारी स्पष्ट केले.
‘जर पक्षाने मला वाराणसीमधून उमेदवारी दिली तर मोदींविरोधात निवडणूक लढवण्यास मी तयार आहे’, असे दिग्विजय सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उत्तर प्रदेशातून सिंग यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा विचार आहे.
वाराणसीमधून मोदींच्या विरोधात आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही निवडणुक लढवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या जागेवर काँग्रेस एखाद्या दिग्गज व्यक्तीला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे.
छान…! पण शेवटी सत्यमेव जयते..! एवढाच लक्षात ठेवा.