दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला.
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सीबीआयने सील केले आहे. केजरीवाल यांनी स्वतः ट्विटरवरून अशी माहिती दिली. थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर छापा टाकण्याची ही पहिलीच घटना आहे.
कार्यालय सील केल्याने केजरीवालांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार हे भित्रं आणि मनोरुग्ण असल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे. तसेच मोदींना मला राजकीयदृष्ट्या हाताळता आले नाही म्हणून त्यांनी हा छापा टाकल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला.
मात्र हा छापा केजरीवालांवर नव्हे तर मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर करण्यात आल्याचे स्पष्टीकरण सीबीआयने दिले. मात्र, सीबीआयच्या स्पष्टीकरणानंतरही केजरीवाल यांनी सीबीआय खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. राजेंद्र कुमार यांच्या नावाखाली माझ्या कार्यालयाची तपासणी सुरू असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
फक्त ऑफिसलाच कशाला ह्याला पण टाळे लावा 🙂