मी काँग्रस पक्षात महत्त्वाच्या पदावर काम करणार असल्याचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्टीकरण प्रियंका गांधी शुक्रवारी दिले आहे.
नवी दिल्ली- मी काँग्रस पक्षात महत्त्वाच्या पदावर काम करणार असल्याचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्टीकरण प्रियंका गांधी शुक्रवारी दिले आहे.
काँग्रेस प्रवक्ते शोभा झा यांनी गुरुवारी गांधी कुटुंबातील सर्वच सदस्यांनी पक्षाचे नेतृत्व करावे अशी सर्वांची इच्छा असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर प्रियंका गांधी सक्रीय राजकारणात येतील आणि काँग्रेस पक्षामध्ये महत्त्वाचे पदावर काम करतील याची चर्चा सुरु झाली होती.
झा यांच्या विधानाआधी ऑस्कर फर्नांडिस यांनी देखील अशा प्रकारचे विधान केले होते. प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्षात अधिक सक्रीय व्हावे. त्यांनी पक्षात महत्त्वाची जबाबदारी घ्यावी असे फर्नांडिस म्हणाले होते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेल्या पराभवानंतर पक्षातील एक गट प्रियंका यांनी नेतृत्व करावे अशी मागणी करत आहे. झा आणि फर्नांडिस यांच्या विधानानंतर आता यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
विशेष म्हणजे अहलाबादमध्ये काही दिवसांपूर्वी ‘काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा चेहरा, प्रियंका लवकरच राजकारणात येत आहेत’ असा फलक लावण्यात आला होता.
डुब्नेवालेको तिन्केका सहारा !!