बाबा रामदेव यांचा पतंजली ब्रँड लवकरच डाबर, मारिको आणि गोदरेज सारख्या कंपन्यांना मागे टाकणार आहे. गेल्या दहा महिन्यांत पतंजलीच्या उत्पादनांचा खप दुपटीने वाढला आहे.
मुंबई- बाबा रामदेव यांचा पतंजली ब्रँड लवकरच डाबर, मारिको आणि गोदरेज सारख्या कंपन्यांना मागे टाकणार आहे. गेल्या दहा महिन्यांत पतंजलीच्या उत्पादनांचा खप दुपटीने वाढला आहे.
दहा महिन्यापासून ते जानेवारी २०१६ पर्यंत पतंजलीच्या उत्पादनांच्या खपाचा आकडा ३,२६७ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. ही वाढ १०६ टक्के असून गेल्या वर्षी पतंजलीचा खप १५८७ कोटी रुपये होता. ब्रिकवर्क या रेटिंग एजन्सीने ही आकडेवारी दिली आहे.
पतंजली आयुर्वेदकडून त्यांनी आकडेवारी मिळवली असल्याचे सांगितले आहे. गेल्या वर्षात पतंजलीने आपल्या उत्पादनांचा आवाका प्रचंड वाढवला आहे. लाभदायक वाढीसह हे शाश्वत राहण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन व विकास, कंत्राटी उत्पादनाचा विस्तार आणि दर्जा नियंत्रण यांची आवश्यकता असते.
डिसेंबर २०१५ पर्यंत गेल्या ९ महिन्यांत मारिकोने ३,९०३ कोटी रुपये तर गोदरेज कंझुमरने ३,५८५ कोटी रुपयांची विक्री केली आहे.
आता gharo ghari jevan banvinyachi aavshakyata naahi, pantjali utpadan khaoon jagaychye! Baba ramdev zindabad!