अभिनयाचे शेहनशहा अमिताभ बच्चन लवकरच छोटया पडद्यावर दिसणार आहेत. ‘आज कि रात है जिंदगी’ या कार्यक्रमाव्दारे अमिताभ छोटया पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
मुंबई – अभिनयाचे शेहनशहा अमिताभ बच्चन लवकरच छोटया पडद्यावर दिसणार आहेत. ‘आज कि रात है जिंदगी’ या कार्यक्रमाव्दारे अमिताभ छोटया पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
पंधरावर्षानंतर पुन्हा एकदा अमिताभ आणि स्टार प्लस मनोरंजन वाहिनी एकत्र आले आहेत. पंधरा वर्षांपूर्वी स्टार प्लस वाहिनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून अमिताभ यांनी छोटया पडद्यावर पदार्पण केले होते. त्यावेळी हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय ठरला होता.
‘आज कि रात है जिंदगी’ या कार्यक्रमातून अमिताभ एका नव्या रुपात प्रेक्षकांना भेटणार आहेत. मी जेव्हा या कार्यक्रमाची संकल्पना ऐकली तेव्हा लगेच होकार दिला. समाजात बदलाला प्रेरणा देणारे प्रसारमाध्यम एक प्रभावी माध्यम आहे यावर माझा विश्वास आहे. आम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून या बदलासाठी प्रयत्न करणार आहोत. या कार्यक्रमाबद्दल मला आवडलेली गोष्ट म्हणजे हा एक मनोरंजनात्मक कार्यक्रम असला तरी यातून योग्य तो संदेश जाईल असे अमिताभ म्हणाले.
मी स्टार इंडिया बरोबर छोटया पडद्यावरील प्रवासाला सुरुवात केली. मला पुन्हा एकदा स्टार प्लससोबत काम करण्याची इच्छा होती असे अमिताभ म्हणाले.
नेते, अधिकारी, राजकारणी, प्रथम दुष्काळ दौरे सोडा, पहिले स्वत: गॅस सबसिडी सोडा….