चेह-यावर शाई फेक झाल्यानंतरही ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन संस्थेचे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या आयोजनावर ठाम आहेत.
मुंबई – चेह-यावर शाई फेक झाल्यानंतरही ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन संस्थेचे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या आयोजनावर ठाम आहेत.
शाई फेकीची घटना घडल्यानंतर काहीवेळाने सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्यासह संयुक्त पत्रकारपरिषद घेतली आणि ठरलेल्या वेळेनुसार कार्यक्रम होणारच असे सांगितले.
कुलकर्णी यांनी उघडपणे शिवसेनेला आव्हान दिले आहे. शिवसेनेने हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
खुर्शिद कसुरी यांच्या ‘नायदर अ हॉकी नॉर अ डव्ह’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयाचा कार्यक्रम सुधींद्र कुलकर्णी यांच्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध आहे.
कुलकर्णी पत्रकारपरिषदेला आले तेव्हा त्यांनी चेहरा धुतला नव्हता. त्यांचा पूर्ण चेहरा आणि कपडे काळया रंगाच्या शाईने माखलेले होते.
त्यापेक्षा अतिरेकीच बोलवून सत्कार घे कि त्यांचा तुज्या घरात कुलाकर्ण्या……..