रत्नागिरी तालुक्यातील सडामि-या आणि राजीवडा येथील शिवसैनिकांनी अंतर्गत कलहाला कंटाळून अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
रत्नागिरी- रत्नागिरी तालुक्यातील सडामि-या आणि राजीवडा येथील शिवसैनिकांनी अंतर्गत कलहाला कंटाळून अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खासदार डॉ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेहताब साखरकर तसेच स्वाभिमान रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर, प्रमोद सावंत, अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश करण्यात आला.
उद्योगमंत्री नारायण राणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. निलेश राणे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तालुक्यातील सडामि-या आणि राजीवडा येथील युवक मतदार असलेल्या शिवसैनिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे या दोन्ही भागात शिवसेनेला खिंडार पडले आहे.
खासदार डॉ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि प्रमोद सावंत, अशोक वाडेकर, अशोक कदम, मेहताब साखरकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या दोन्ही भागातून शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने शिवसेना-भाजप युतीला जोरदार धक्का बसला आहे.
सडामि-यातील धर्मेश सावंत, प्रणय सावंत, अभिजीत सावंत, विक्रम सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे तर राजीवडा बांध येथील अब्दुल हमीद बुडय़े, नुरूद्दीन नावडे, सलील नावडे, जुबेर दावत या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
Shivsenet aata wagh rahile nahit aata fakt chate rahilet!!!!!!!!