शाळेत असताना आपल्याला ज्ञानेंद्रियांची ओळख करून दिली जात होती. कान, नाक, जीभ, डोळे व त्वचा यापैकी आपण कोणतेही एक ज्ञानेंद्रिय नसल्याचा विचार आपण करू शकत नाही. पण आज आपल्या अवतीभोवती अशी अनेक उदाहरणे सहज दिसतात की ज्यांना यातील काही ज्ञानेंद्रिये नाहीत आणि यात सर्वात जास्त दृष्टिहिनांची संख्या दिसते.
शाळेत असताना आपल्याला ज्ञानेंद्रियांची ओळख करून दिली जात होती. कान, नाक, जीभ, डोळे व त्वचा यापैकी आपण कोणतेही एक ज्ञानेंद्रिय नसल्याचा विचार आपण करू शकत नाही. पण आज आपल्या अवतीभोवती अशी अनेक उदाहरणे सहज दिसतात की ज्यांना यातील काही ज्ञानेंद्रिये नाहीत आणि यात सर्वात जास्त दृष्टिहिनांची संख्या दिसते. या दृष्टिहिनांसाठी मदतीचे अनेक हात पुढे येणं गरजेचं आहे. यातील महात्त्वाचा भर हा आजच्या तरुण पिढीने घेतलेला आहे. आजची तरुण पिढी ही फक्त पैशांच्या मागे धावताना दिसत आहे, आपणही समाजासाठी काहीतरी देणं लागतो ही भावना त्यांच्या मनात असते. भारत हा विकसनशील देश आहे. विकासाच्या नव्या टप्प्यावर आज भारताचे नाव आहे. याची सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे तरुण वर्ग. सध्याच्या तरुण पिढीमध्ये देशातील नवे आणि गरजेचे बदल घडवण्याची ताकद आहे. त्या दृष्टीने त्यांची वाटचालसुद्धा अनेक ठिकाणी दिसते.
सामान्य मुलांना परीक्षा म्हटली की अभ्यासाची भीती असते पण या असमान्यातून सामान्य असणा-या अंध मुलांसाठी एक आव्हान असते. फक्त अभ्यास ही एकच गोष्ट त्यांना परीक्षेच्या काळात करायची नसते तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या परीक्षेसाठी रायटर किवा लेखनिक मिळवणे. अनेकदा तर अंध मुलांची अभ्यास बाजूला ठेवून नेहमीप्रमाणे आधी परीक्षेसाठी रायटर, मग अभ्यास अशी काहीशी अवस्था असते.
या सा-या गोष्टींचा विचार करताना आज मुंबईसारख्या मोठय़ा शहरात काही हातावर मोजण्याइतपत संस्था आहेत, ज्या अंध मुलांना रिडर, रायटर मिळवून देतात. आपल्या परीक्षेचा एक महत्त्वाचा भाग आणि चिंता या संस्थांवर सोपवून अंध मुलं निर्धास्थ पणे काम करतात. पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा या संस्था रिडर रायटरचे काम मनापासून करणारे हात मिळतील. शालेय परीक्षा देणा-या अंध मुलांना ब-याचदा कोणत्याही वयोगटातील मुलं रायटर म्हणून चालू शकतात. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्यांला रायटर हवा आहे असे समजते तेव्हा सगळ्यात आधी रायटर कसा असावा या बाबत चर्चा होते. वय, शिक्षणाची मर्यादा या गोष्टीचा तिथे विचार केला जातो. पण अनेकदा कोणत्याही वयोगटातील आणि कोणतीही शिक्षण मर्यादा नसलेल्यांना सुद्धा काम करता येते. तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण या कामात हातभार लावू शकतात. यात पैशापेक्षा माणुसकीचा व्यवहार महत्त्वाचा मानला असल्याने, अशा स्पेशल मुलांकरिता रायटरशिप करताना तुम्हाला फार मोठा आर्थिक मोबदला मिळेल असे नसते.
अनेक संस्था आहेत, ज्या या मुलांसाठी काम करतात. नॅब, आय डॉल, पल्स व्हिजन, नेत्र, कर्तव्य यासारख्या संस्था अंध मुलांना आपले नवीन भविष्य घडवण्यासाठी मदत करतात. पण आज त्यांना अनेक लोकांची गरज आहे, जे त्यांना मदत करतील. १२ वीनंतरचे कॉलेज करतानाच ज्याला यात सहभागी व्हायचे आहे, त्यांना या संस्थाच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवता येईल आणि आपला मदतीचा हात पुढे करता येईल. तरुण पिढीने असे काम करावे की, तिथे फक्त पैसे हाच एक उद्देश राहता कामा नये. समाजासाठी काम करा. पैसे आपोआप मिळतील. तुम्ही आम्हाला सुद्धा संपर्क करू शकता या मेल आयडी वर -feature@prahaar.co.in किवा apoorvaapte10@gmail.com आणि पाठवा आपले नाव, फोन नंबर आणि या मुलांच्या सुंदर भविष्याचा एक भाग व्हा.
– मो.९७६९८७८५०३
मला अंध मुलांसाठी लेखनिक म्हणून काम करायची इच्छा आहे. कुणाला कॉन्टॅक्ट करावा?
मी विज्ञान स्नातक असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांवर चांगले वर्चस्व आहे.
आपल्या अंध बांधवांसाठी काहीतरी करावे ही मनापासून इच्छा आहे.
माझा ई-मेल netradaoo@gmail.com