अमेरिकेत व्हिसा घोटाळ्याप्रकरणी खटला सुरु असलेल्या भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे मंगळवारी मुंबईमध्ये दाखल झाल्या.
मुंबई – अमेरिकेत व्हिसा घोटाळ्याप्रकरणी खटला सुरु असलेल्या भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे मंगळवारी मुंबईमध्ये दाखल झाल्या. गेल्याच आठवड्यात त्या भारतामध्ये परतल्या होत्या. मुंबईमध्ये आल्यावर त्यांनी सर्वप्रथम मुंबईकरांचे आभार मानले.
‘मला दिलेल्या प्रेम आणि सहयोगासाठी मी मुंबईचे फार आभार मानते,’ असे देवयानी यांनी सांगितले. देवयानी खोब्रागडे यांचे स्वागत करण्यासाठी ‘आरपीआय’च्या कर्मचा-यांनी विमानतळावर एकच गर्दी केली होती. माजी निवृत्त अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या देवयानी काही दिवस वर्सोवामधील त्यांच्या कुटुंबासोबत राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिसा घोटाळ्या प्रकरणी देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात अमेरिकेत खटला दाखल करण्यात आला आहे. १२ डिसेंबरला व्हिसा घोटाळ्याप्रकरणी त्यांना न्यूयॉर्कमधून अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती.
देवयानी यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप भारताने केला होता.
this is very easy and usaful software to all peoples, thanks to prahaar