चर्चगेट-डहाणू उपनगरीय सेवेला मंगळवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
डहाणू – तब्बल १८ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर डहाणू-चर्चगेट लोकलसेवेची स्वप्नपूर्ती मंगळवारी झाली. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि सकाळी डहाणूहून पहिली लोकल चर्चगेटकडे सुटली. यावेळी जमलेल्या शेकडो प्रवाशांनी आनंद व्यक्त करत या नव्या लोकलचे स्वागत केले.
१९९५मध्ये पश्चिम रेल्वेची लोकलसेवा डहाणूपासून सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याला तब्बल १८ वर्षानी यश मिळाले आहे. चर्चगेट ते डहाणू या १२४ किलोमीटर पल्ल्यापैकी विरार ते डहाणू या ६४ किलोमीटर अंतरामध्ये राहणा-या बहुसंख्य आदिवासींना या सेवेमुळे बोईसर, वसई, भाईंदर या औद्योगिक वसाहतीत जाऊन काम करणे लाभदायक ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केला.
उपनगरीय रेल्वे प्रवाशांकडून रेल्वेला मिळणा-या उत्पन्नातील अधिकाधिक खर्च उपनगरीय रेल्वे स्थानकातील सोयी-सुविधांवर करावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
[EPSB]
डहाणू-चर्चगेट लोकलला उद्याचा मुहूर्त
चर्चगेट-डहाणू लोकल सुरू करण्याबाबत पश्चिम रेल्वेने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अखेर मंगळवारी होणार आहे.
[/EPSB]
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना खुप आनंदाची बातमी आहे.
हार्बर मार्गावर (सीएसटी – पनवेल) १२ डब्यांच्या गाड्या कधी धावणार?