पूर्वी राजेमहाराजांच्या साहसाच्या, कर्तृत्वाच्या गोष्टी सांगितल्या जायच्या त्या वेळी महाराजांच्या पराक्रमांबद्दल त्यांना ‘चंडप्रतापी’ असे नामाभिधान लावले जायचे. दरबारात त्यांच्या आगमनाच्या वेळी ललका-या व्हायच्या, तुतारी वाजायची आणि घोषणा व्हायची, ‘कीर्तिमान, धैर्यवान, नरवीर, चंडप्रतापी राजाधिराज महाराज अमूकढमूक’ यांची स्वारी येत आहे हो.. संस्थाने खालसा होईपर्यंत ही पद्धत सुरू होती. आजच्या नव्या युगात ठाणे संस्थानात ‘चंडप्रतापी’ ही पदवी आमदार प्रताप सरनाईक यांना त्यांच्या कामगिरीमुळे चपखल ठरावी. डोंबिवली ते ठाणे अशी मजल मारताना राजकीय पक्षाशी संलग्न विद्यार्थी संघटनेचा स्थानिक पदाधिकारी ते धोरणी राजकारणी अशा वाटचालीत त्यांनी आमदारकीपर्यंतचा प्रवास अशा झपाटयाने केला आहे की, ठाण्यातलेच आणखी एक स्वयंघोषित ‘संस्थानिक’ही त्यांना थोडे बुजून असतात. एकेकाळी ठाणेकरांचे कैवारी आमदार जितेंद्र आव्हाड आणि सरनाईक यांच्या यारीदोस्तीच्या कथा सांगितल्या जात असत. कुठेतरी काहीतरी बिनसले आणि सरनाईक बाजूला झाले. स्वत:चाच झेंडा खांद्यावर घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना अशी सफाईदार उडी मारताना त्यांनी आमदारकीही पदरात पाडून घेतली. आता या दोघांमधील खुन्नस जगजाहीर झाली आहे. ठाण्यातील अनेक विषयांच्या निमित्ताने महापालिकेपासून विधानसभेपर्यंत या दोघांमधील मतभेदांचे आणि वैयक्तिक दुराव्याचे प्रत्यंतर सातत्याने येत असते. आव्हाडांच्या छायेखालून बाहेर पडल्यावर एकीकडे राजकीय कार्यकर्ता ते आमदार अशी मजल आणि त्याचवेळी दुस-या बाजूने एक हिशोबी उद्योजक, यशस्वी बिल्डर ही प्रतिमा वर्धमान करणा-या सरनाईक यांचा चंड‘प्रतापी’पणाची ख्याती सर्वदूर पसरत असतानाच ठाणे महापालिकेचे आयुक्त आर. राजीव यांच्या खमकेपणामुळे सरनाईक यांच्या प्रतापी कारनाम्यांचा फुगा गेल्या काही महिन्यांत जमिनीवर आला आहे. पाणीचोरीचे प्रकरण असो वा गुरुवारीच जाहीर झालेले विहंग अपार्टमेंट आणि छाब्रिया पार्क या इमारतींमधील बेकायदा मजल्यांचे प्रकरण राजीव यांनी सरनाईक यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. गेल्या काही महिन्यांत आयुक्तांवर नाना प्रकारे दोषारोप करून सरनाईक यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे आणि विधानसभेतही केली होती. याच वेळी त्यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र या इमारतीतील अनधिकृत व्यायामशाळेमुळे अडवून ठेवत आयुक्तांनी सरशी केली होती. ही व्यायामशाळा हटवल्यावरच आता या इमारतीला प्रमाणपत्र मिळाले आहे. यापाठोपाठ आता उच्च न्यायालयानेही चपराक लगावल्यामुळे सरनाईक खिंडीत पकडले गेले आहेत. त्यांच्या कोंडीमुळे ठाण्यातील शिवसेनेचे एक नाथ, इतर आमदार आणि पदाधिका-यांच्या चेह-यावर हास्य फुलले आहे. शिळफाटा येथील इमारत दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, ती अगदी कुणा आमदाराची असतील तर ती सर्वप्रथम पाडा’, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. शरद पवार यांच्या टप्प्यात बहुधा तेव्हा हेच चंड‘प्रतापी’ आमदार असावेत!
चंड‘प्रतापी’
RELATED ARTICLES
LEAVE A REPLY
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
he anadhikrut bandhkamache pra,chand pratapi