मुंबईच्या बाजारात सध्या ‘ड्रॅगन’ दाखल झाला आहे. हं हं.. घाबरण्याचे कारण नाही. कारण हा प्राणी नसून एकप्रकारचे ‘फळ’ आहे.
मुंबई – मुंबईच्या बाजारात सध्या ‘ड्रॅगन’ दाखल झाला आहे. हं हं.. घाबरण्याचे कारण नाही. कारण हा प्राणी नसून एकप्रकारचे ‘फळ’ आहे. हे फळ दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असल्याने मुंबईकरांनाही त्याबद्दल उत्सुकता आहे. गुलाबी, पिवळे व किंचित गडद लाल रंगाचे हे फळ सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे. या फळाचे साल अतिशय पातळ व गर लाल व पांढ-या पारदर्शक रंगाचा असून, हे फळ चवीला गोड आहे.
मुंबईतील प्रमुख बाजारपेठांत सध्या हे फळ उपलब्ध आहे. या फळाला खूप प्रतिसादही मिळत आहे. विशेषत: मुंबईकरांना या फळाची उत्सुकता असल्याने या फळाची जोरदार विक्री होत आहे. दादरमधील गोविंदास सोनकर या फळ विक्रेत्याच्या मते,
‘ड्रॅगन’चे उत्पादन कुठे होते, हे सध्या तरी कुणालाच माहीत नाही. हे फळ दक्षिण अमेरिकेतून आले असावे, असे मानण्यात येत आहे. जगभरातील उष्ण कटीबंध प्रदेशांत या फळाची लागवड केली जाते. ‘ड्रॅगन’चे झाड जमिनीपासून २० फूट (सुमारे सहा मीटर) वाढते. पण सध्या तरी हे फळ थायलंडमधून येत आहे. वाशीतील एपीएमसी मार्केटमधून ते नंतर मुंबईतील वेगवेगळ्या बाजारांत येते. सुरुवातीला या फळाचा भाव १५० रुपये ते २५० रुपये किलो इतका होता. पण चीनमधून अधिक आवक झाल्याने भाव घसरला. आता हे फळ ६० रुपये ते १५० रुपये किलो या भावात मिळत आहे. हिवाळ्यात केवळ भारतीय फळांत द्राक्ष येतात. पण ती आंबट लागत असल्याने मुंबईकरांचा कल परदेशी फळांकडे आहे.
डेंग्यू व मलेरियाच्या आजारात ड्रॅगन हे फळ खाल्ले जाते, असे मानतात. हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते व पांढ-या पेशीही वाढण्यात मदत होते, असा समज असल्यानेही या फळाला अधिक पसंती मिळत आहे.
not bad