देशातील आघाडीची मोबाइल सेवा पुरवठादार एअरसेलने बुधवारी दिल्ली आणि राजस्थाननंतर मुंबईमध्ये थ्री-जी सेवा सुरू केल्याची घोषणा केली.
मुंबई- देशातील आघाडीची मोबाइल सेवा पुरवठादार एअरसेलने बुधवारी दिल्ली आणि राजस्थाननंतर मुंबईमध्ये थ्री-जी सेवा सुरू केल्याची घोषणा केली. यामुळे एअरसेलच्या मुंबईतील ग्राहकांनाही वेगवान थ्री-जी सेवा त्यांच्या मोबाइल तसेच डोंगलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
महिन्यासाठीचा टॅरिफ प्लॅन १०७ रुपये ते ३४९ रुपयांपर्यंत उपलब्ध करण्यात आला असून यात ३०० एमबी ते दोन जीबी थ्री-जी डेटा वापरण्यासाठी मिळणार आहे. ज्यामध्ये ३०० एमबी डेटा फेसबुक आणि व्हॉट्स अॅपसाठी मोफत देण्यात आला आहे. याबरोबरच एक, तीन, सात आणि तीस दिवसांसाठी इंटरनेट पॅक आणण्यात आले असून जे १३ रुपये ते १९५ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
५५ एमबी ते १०२४ एमबी थ्री-जी डेटा वापरण्यास मिळणार आहे. या माध्यमातून स्पोर्ट्स मॅच, टीव्ही शो, इंटरनेट गेमिंग आणि सोशल मिडियाचा आनंद घेता येणार आहे. रिलायन्स कम्युनिकेशनबरोबर भागीदारी करून एअरसेलने ही सेवा सुरू केली आहे.
धन्यवाद