वेगळ्या तेलंगणाच्या मुद्दयावर येथील नेकलेस मार्गावर उस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.
हैदराबाद – वेगळ्या तेलंगणाच्या मुद्दयावर येथील नेकलेस मार्गावर उस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी एनसीसीच्या गेटवर उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुर सो़डला.
खरतर,विद्यार्थ्यांनी ‘जय तेलंगाणा’ चा जयघोष करत सुरक्षाकडे तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. या हल्ल्यात काही विद्यार्थी जखमी झाले.
दुपारी तीन वाजता तेलंगाणाच्या मुद्दयावर नेकलेस मार्गावर तेलंगाणा अॅक्शन कमिटीला रॅली काढण्याची परवानगी होती. पण उस्मानियाच्या विद्यार्थ्यांना ही परवानगी नव्हती.
‘सप्टेंबरमध्येच वेगळ्या तेलंगाणाचा निर्णय’
तेलंगाणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष चंद्रशेखर राव यांनी वेगळ्या तेलंगाणाचा निर्णय याच महिन्यात घेतला जाईल असं वक्तव्य पाच सप्टेंबरला पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. याबाबतीत कोणतीही शंका आता राहिली नाही. केंद्र सरकारने आपला ‘वादा’ पूर्ण केला नाही तर तेलंगाणाच्या मुद्दयावरील आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
I have been so beeeldwrid in the past but now it all makes sense!