सरकारी क्षेत्रातल्या बँक ऑफ बडोदाने गृहकर्जात पाव टक्क्यांची कपात केली आहे
मुंबई – सरकारी क्षेत्रातल्या बँक ऑफ बडोदाने गृहकर्जात पाव टक्क्यांची कपात केली आहे. बँकेच्या जून्या आणि नव्या ग्राहकांना या कपातीचा फायदा सोमवारपासून घेता येणार आहे. आर्थिक मंदीच्या काळात पैसा खेळता रहावा यासाठी व्याजदरात कपात करण्यात आल्याचं बँक ऑफ बडोदाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियानेही गेल्या महिन्यात गृहकर्ज आणि वाहनविषयक कर्जाच्या व्याजदरात कपात केली होती. स्टेट बँकेच्या या पावलानंतर खाजगी क्षेत्रातल्या आयडीबीआय, ओरियंटल बँक, कॉर्पोरेशन बँक, देना बँक आणि इंडियन बँकेनेही गृहकर्जावरील व्याजदर घटवले.
bank loan sati saglya banka amchya service changlya ahet mhntat ani tith gelyawar nahi honar as sangtat,mag chukichi advertisement ka karta?????
Maza PCMC madhe Ghakul yojnet naav ahe,ani mi 50,000/- bharlet,Mala bank of maharashtra dili hoti,kahi vicharpus n kartach mala manager mhnlya ki,tumhi dusri bank bagha, mi tepn kel, tr nhi hou shakt hech Answer aal.