चलन बाजारात रुपयामध्ये झालेल्या विक्रमी अवमूलनाने बुधवारी शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला.
मुंबई– चलन बाजारात रुपयामध्ये झालेल्या विक्रमी अवमूलनाने बुधवारी शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला. यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २२० अंकांपर्यंत घसरला. मात्र अर्थमंत्र्यांनी आर्थिक सुधारणांवर भर देण्याचे संकेत दिल्यांनतर बाजारातील स्थिती पालटली. यानंतर झालेल्या खरेदीने सेन्सेक्स मोठय़ा घसरणीतून सावरत तीन अंकांच्या घटीसह १९,३४५.७० वर बंद झाला.
बाजारात बांधकाम, एफएमसीजी, बँकिंग, ऊर्जा या क्षेत्रात विक्रीचा जोर होता. यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १३ अंकांच्या घसरणीसह ५,७४२ अंकांवर बंद झाला. चलनातील अवमूलनाने गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिला असल्याचे शेअर दलालांनी सांगितले. ज्यामुळे सेन्सेक्सवर दबाव होता.
दरम्यान चलन बाजारात रुपयाने सकाळच्या सत्रात ६१.२० च्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. मात्र निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचा रुपयाला फायदा झाला आणि तो डॉलरच्या तुलनेत सात पैशांनी वधारून ६०.४० वर बंद झाला.
Thanks for coubirtnting. It’s helped me understand the issues.