मध्यमवर्गीयांचे मोटारीचे स्वप्न पूर्ण करणारी ‘मारुती ८००’ ही सर्वाधिक खपाची मोटार लवकरच इतिहासजमा होणार आहे.
हैदराबाद – मध्यमवर्गीयांचे मोटारीचे स्वप्न पूर्ण करणारी ‘मारुती ८००’ ही सर्वाधिक खपाची मोटार लवकरच इतिहासजमा होणार आहे. गेल्या महिन्यापासून या मोटारीचे उत्पादन बंद करण्यात आले असल्याचे मारुती सुझुकीने शुक्रवारी स्पष्ट केले. मोटारीचे उत्पादन बंद करण्यात आले असले तरी या मोटारीच्या सुटय़ा भागांचा पुरवठा मात्र सुरूच राहणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
मारुतीने १८ जानेवारीपासून ८०० मोटारीचे उत्पादन पूर्णपणे बंद केले आहे. एप्रिल २०१० पासूनच कंपनीने या मोटारीची विक्री बंद केली होती. यानंतरच्या उत्पादित मोटारी या सुटय़ा भागांची पूर्तता करण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. ज्यामुळे या मोटारी भविष्यात इतिहासजमा होणार आहेत.
मारुती ८०० चे उत्पादन बंद करण्यात आले असले या मोटारीचे सुटे भाग पुढची ८ ते १० वर्षे मिळतील, असे मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक सी. व्ही. रामन यांनी सांगितले. ग्राहकांना सर्वोच्च दर्जाच्या मोटारी देण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
८० दशकात आलेल्या ८०० मोटारीने कंपनीला नवी ओळख निर्माण करून दिली. केवळ ५०,००० रुपयांना मिळणा-या या मोटारीची सध्याची किंमत २ लाख ३५ हजारांपर्यंत गेली होती.
I have used Maruti 800 model nearly for a decade. Run was exellent. service was no worry. It ran even 900 kms a day without any complaint.
Company may continue to manufacture this model by introducing modern emmission techniques in it. people still like this model hence with certain engine upgradations, it should be kept in market…..