हिट अँड रन प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या खटल्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने आणखी पंधरा दिवसांसाठी म्हणजे एक जुलै पर्यंत पुढे ढकलली आहे.
मुंबई – हिट अँड रन प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या खटल्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने आणखी पंधरा दिवसांसाठी म्हणजे एक जुलै पर्यंत पुढे ढकलली आहे.
सुनावणीसाठी खटल्याची कागदपत्रे तयार नसल्याने उच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख पुढे ढकलताना वेगाने कागदपत्रे तयार करण्याचे आदेश दिले. सोमवारी न्यायमूर्ती ए.आर.जोशी यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले तेव्हा सलमानचे वकील अमित देसाई यांनी न्यायालयाकडून फिर्यादी आणि बचाव पक्षाला जी कागदपत्रे दिली जातात ती तयार नसल्याची माहिती दिली.
त्यावर न्यायमूर्तींनी कागदपत्रे जलदगतीने तयार करण्याचे आदेश देताना सुनावणी एक जुलैपर्यंत पुढे ढकलली. सहा मे रोजी सत्र न्यायालयाने हिट अँड रन प्रकरणात सलमानला दोषी ठरवत पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.
सलमानने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिक्षा झाल्यानंतर सलमानला एक दिवसही तुरुंगात काढावा लागला नाही. आठ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सलमानच्या शिक्षेला स्थगिती देत त्याला जामीन मंजूर केला.
सोमवारी झालेल्या सुनावणीला सलमान न्यायालयात उपस्थित नव्हता सलमानच्या वतीने त्याची बहिण अलवीरा न्यायालयात उपस्थित होती. २८ सप्टेंबर २००२ च्या रात्री बांद्रयामध्ये सलमानने बेदरकारपणे वाहन चालवून फूटपाथवर झोपलेल्या पाचजणांना आपल्या गाडीखाली चिरडले होते यातील एकाचा मृत्यू झाला तर, चार जण जखमी झाले होते.
अरे भाई ओर पचास साल जाने दो ,उसके बाद एक दो दिन के लिये salman भाई को जेल में डालो ,आपका भी भला ओर
भाई. का भी भला ,!