जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढता लढता वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक. पतीच्या निधनानंतर त्यांनी डोळ्यांतले अश्रू पुसून लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णयच नाही तर लवकरच त्या अधिकारी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रशिक्षणाकरता चालल्या आहेत.
स्वाती महाडिक. जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढता लढता वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी. दोन लहान मुलांची आई. कुणाची तरी लेक, कुणाची तरी बहीण, कुणाची तरी भावजय आणि आता देशासाठी लढण्याचा निर्धार केलेली भारतीय सन्याची एक शूर अधिकारी.
कर्नल संतोष महाडिक देशासाठी लढता लढता हुतात्मा झाले, तेव्हा स्वाती दु:खावेगाने चिरडून जरूर गेल्या होत्या; पण त्यांच्या डोळ्यात पेटून उठले होते अंगारे. त्यांचं लग्न झालं होतं तेव्हा लाजाहोमाच्या अग्नीला साक्षी ठेवून त्यांनी पतीला वचन दिलं होतं की सदैव बरोबर वाटचाल करेन.
गेल्या वर्षी पतीच्या चितेच्या अग्नीला साक्षी ठेवून, डोळ्यातले अश्रू पुसून त्यांनी संतोष यांना मनोमन दुसरं वचन दिलं, ‘तुमचे राहिलेले काम मी पुरे करेन. तुमच्या जागी मी आर्मीत जाईन. देशासाठी लढेन.’
ते स्वप्न पुरं करणं सोपं नक्कीच नव्हतं. सन्य भरतीची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण असते. त्यात त्यांचं वय त्यांच्या विरुद्ध होतं. सन्यात अधिकारी म्हणून जॉईन होण्यासाठी जी कमाल वयोमर्यादा असते ती स्वाती महाडिक कधीच ओलांडून गेल्या होत्या; पण संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी भारतीय सन्याचे प्रमुख जनरल दलबीर सिंग यांच्या शिफारसीवरून खास स्वाती महाडिक यांच्यासाठी वयाची अट शिथिल केली.
परीक्षेला बसायची परवानगी मिळाली; पण सन्यात अधिकारी म्हणून भरती होणं सोपं थोडंच आहे? त्यासाठी शारीरिक, मानसिक अशी सगळीच तयारी लागते. त्यासाठी स्वाती महाडिक यांना खूप कष्ट घ्यावे लागले, खूप त्याग करावा लागला. ररइच्या निवड चाचणीची तयारी व्यवस्थित करता यावी म्हणून त्यांनी काळीज घट्ट करून मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये घातलं.
लहान असली तरी मुलं ही वीराचीच मुलं. त्यामुळे त्यांनी आईला समजून घेतलं. मुलगी कार्तिकी ही सहावीला असून डेहराडूनच्या बोर्डिग स्कूलमध्ये तर मुलगा स्वराज्य याला पाचगणी येथल्या बोर्डिग स्कूलमध्ये ठेवलं. बंगळुरूला गेल्यावर वैद्यकीय, शारीरिक आणि इतर चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना लष्करात प्रवेश मिळेल असं कर्नल महाडिक यांचे बंधू जयवंत घोरपडे यांनी त्यांना सांगितलं. या निवड चाचणीच्या प्रक्रियेस एक-दीड महिना लागतो.
दिवस-रात्र मेहनत करून स्वाती निवड प्रक्रियेत यशस्वी ठरल्या आणि आता चेन्नई येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रशिक्षणाकरता त्या चालल्या आहेत.
एका सावित्रीने स्वत:च्या पतीच्या आयुष्यासाठी प्रत्यक्ष यमाशी झुंजून त्याला परत आणलं. स्वाती महाडिक आपल्या दिवंगत वीर पतीचं अधुरं राहिलेलं स्वप्न पुरं करण्यासाठी आपल्या दु:खाला आवर घालून आपल्या पतीच्या जागी देशासाठी लढणार आहे.
पतीच्या निधनानंतर पतीचं भारतमातेची सेवा करण्याचं अधुरं स्वप्न पूर्ण करणं ही काही साधी गोष्ट नाही. कारण या स्वप्नपूर्तीसाठी तिला तितकाच त्यागही करावा लागला. पण हा त्याग करण्यासाठी तिने जे धाडस दाखवलं त्या धाडसाला खरोखरच सलाम द्यायलाच हवा.
माझ्या बहिणीला नमस्कार