पंजाबमधील मोगा बस प्रकरणात जे काही घडले ती देवाची इच्छा असल्याचे वादग्रस्त विधान पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांनी केले आहे.
मोगा- पंजाबमधील मोगा येथे धावत्या बसमध्ये झालेल्या मायलेकींच्या छेडछाडीनंतर मुलीचा बसमधून पडून मृत्यू झाला होता, तर आई गंभीर जखमी झाली होती. मात्र घडलेला प्रकार म्हणजे देवाची इच्छा असल्याचे वादग्रस्त विधान पंजाबचे शिक्षणमंत्री सुरजित सिंग राखरा यांनी केले आहे.
‘ही प्रकरणे कोणीही थांबवू शकत नाही. जे काही घडते ती देवाची इच्छा. अनेकदा आपण याबाबतच्या घटना पाहतो. भविष्यात या घटना रोखण्यासाठी नक्कीच काळजी घेतली जाईल. जे घडले ते दुर्दैवी होते. मात्र निसर्गाच्या इच्छेविरोधात कोणीही जाऊ शकत नाही,’ अशी मुक्ताफळे राखरा यांनी उधळली आहेत.
तोपर्यंत अंत्यसंस्कार नाही
मुलीवर अत्याचार झालेली बस बादल कुटुंबीयांच्या मालकीची होती. त्यामुळे बादल यांच्यावर गुन्हा दाखल करेपर्यंत मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका मुलीच्या वडिलांनी घेतली आहे. राजकीय दबावाखाली आम्हाला धमक्या येत आहेत. त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण मिळाले पाहिजे.
भारतातले प्रत्येक राज्यातले जन महाराष्ट्रातल्या मुंबईत का येतात याचे उत्तर पंजाबच्या शिक्षण मंत्र्याने दिले आहे.पंजाबी स्त्री म्हणते हम बंबई मे २० साल हो गये रहते हॆ.रातको २ बजे रस्तेपे घुमते हे फिर भी हमे डर नही लगता.हमारे पंजाब मे शाम ६ के बाद अकेली ओरत बाहर नही निकलती.कोकणातल्या मराठी माणसाने भारतातल्या स्त्रियांना मुंबई मध्ये सन्मानाने वागवले त्याची पोच पावतीच पंजाबी स्त्री ने दिली.