आर्थिक विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय सहकार्य गरजेचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रँकफर्टर एल्जेमीन जीटुंग या जर्मन वर्तमानपत्रामधील लेखात म्हटले आहे.
हॅनोवर – विकास हा आमच्यासाठी फक्त राजकीय कार्यक्रम नसून, तो आमच्या विश्वासाचा विषय आहे. आर्थिक विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय सहकार्य गरजेचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रँकफर्टर एल्जेमीन जीटुंग या जर्मन वर्तमानपत्रामधील लेखात म्हटले आहे.
जर्मन दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्तमानपत्रासाठी लेख लिहीला असून, त्यात त्यांनी आपल्या सरकारच्या उद्योग आणि आर्थिक धोरणांची माहिती दिली आहे. स्थिर आणि पारदर्शक कर व्यवस्थेचे आश्वासन देत मोदींनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारताच्या विकास इंजिनाला आम्ही पुन्हा एकदा गती दिली आहे. आमच्या अर्थव्यवस्थेची विश्वासहर्ता परतली असून, भारत वेगाने विकासाच्या वाटेवर निघाला आहे असे मोदींनी लेखात म्हटले आहे.
भारत अशी एकमेव उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे जिथे विकास दर वाढतच रहाणार आहे. उद्योजकांना इथे चांगले भवितव्य आहे. विकास आणि भारतात आर्थिक परिवर्तनाचे आव्हान आमच्या सरकारने स्वीकारले आहे असे मोदींनी म्हटले आहे. कॉर्पोरेट कर कमी केला असून, २०१६ पर्यंत जीएसटी कर प्रणाली लागू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विदेशी भांडवलदार कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित केल्या नंतर जुनाट तंत्रज्ञान भारताच्या गळ्यात मारण्याचे काम करतात.भारतातील राजकीय नेत्ये विदेशातील भंगार गोळा करण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. मोदी त्याला अपवाद कसे असतील.कोळशावर आधारित उधोग बंद करण्याचा निर्णय युरोपियन राष्ट्र समुदायांनी घेतला.त्या बरोबर भारतीय नेत्यांनी कोळशावर आधारित वीज निर्माण करण्याचे प्रकल्प सुरु केले.विदेशातील भंगार गोळा करून घेऊन आलेत.आता विदेशात ६ जी ७ जी तंत्रज्ञान विकसित झाले आहे.त्यांनी ३जि ४ जी तंत्रज्ञान भंगार मध्ये काडले आहे.भातीय नेते ३जि ४जि मोबाईल/मोबाईल टॉवर भारतात आणत आहेत.400 वर्षानपूर्वी पृथ्वी सपाट आहे. सूर्य पृथ्वी भोवती फिरतो, पृथ्वी स्थिर आहे, असे बोलणारे प्रगती करतात. आम्ही प्रगती करणार आहोत असे बोलतो. आमचा भारत देश महान आहे. आमची बुद्धी विदेशात गहाण आहे. मुर्ख राजकारणी आमची शान आहे. भारत देशात आम्ही भारतीय आहोत असे बोल्नाराची तलवारीवर मान आहे.