Friday, May 3, 2024
Google search engine
Homeमनोरंजनमल्टिप्लेक्स ‘क्रिश ३’ विकाऊ पण पकाऊ

‘क्रिश ३’ विकाऊ पण पकाऊ

चित्रपटाचं नाव ‘क्रिश ३’ का, असा प्रश्न अनेकांना पडतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट तिस-या दर्जाचा आहे की काय, अशी शंका येते. चित्रपटाची सुरुवात होते ती ‘कोई मिल गया’ व ‘क्रिश ’या मागील चित्रपटातील कथानकांच्या काही तुकडयांनी. कदाचित हा ‘क्रिश ३’ का बनवला आहे, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा हा प्रयत्न असावा.

चित्रपट : क्रिश ३
दिग्दर्शक : राकेश रोशन
कलाकार : हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा, कंगना रनौत, विवेक ओबेरॉय


चित्रपट सर्जनशीलतेचं माध्यम असतं. सर्जनशीलता आली की त्यात नवनिर्मिती आलीच. कधी कधी एखादा दिग्दर्शक एक नवी कल्पना आणतो. ती यशस्वी होते. त्यानंतर मात्र तो त्या कल्पनेच्या प्रेमातच पडतो. मीच ही कलाकृती चांगल्या प्रकारे मांडू शकतो अशी एक अहंकाराची भावना त्याच्या मनात निर्माण होते. कलाकृतीचं एक वैशिष्टय असतं. ती कलाकाराला नावलौकिक मिळवून देत असली तरी त्याला आपल्यापेक्षा मोठा होऊ देत नाही. ज्या कलाकारांना हे माहीत आहे ते सतत यशस्वी होतात, जे यावर विश्वास ठेवत नाहीत ते मात्र कधी कधी तोंडघशी पडतात. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे राकेश रोशनचा ‘क्रिश ३’ हा चित्रपट.

या चित्रपटाचं नाव ‘क्रिश ३’ का, असा प्रश्न अनेकांना पडतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट तिस-या दर्जाचा आहे की काय, अशी शंका येते. चित्रपटाची सुरुवात होते ती ‘कोई मिल गया’ व ‘क्रिश ’या मागील चित्रपटातील कथानकांच्या काही तुकडयांनी. कदाचित हा ‘क्रिश ३’ का बनवला आहे, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा हा प्रयत्न असावा. त्यानंतर या चित्रपटाच्या कथानकाला सुरुवात होते. आताच्या काळात क्रिश म्हणजे क्रिष्णा (हृतिक रोशन) हा एकापाठोपाठ एक नोक-या बदलत असतो.

आपण क्रिश आहोत हे लोकांना कळू नये अशी दक्षता तो बाळगत असतो. त्याची पत्नी प्रिया (प्रियांका चोप्रा) ही एका वृत्तवाहिनीवर निवेदक असते. त्याचे वडील रोहित मेहरा (हृतिक रोशन) हे एका राष्ट्रीय प्रयोगशाळेत संशोधक पदावर कार्यरत असतात. चित्रपट सुरू होतो तेव्हा एका विमानाचे ‘लँडिंग गिअर’ खराब झालेले असतात. क्रिश तिथे पोहोचतो व तो लोकांना वाचवतो. त्यानंतर खलनायक काल (विवेक ओबेरॉय) हा एक व्हायरस तयार करतो. तो हा व्हायरस एका देशात सोडतो. तिथे लोकांचे बळी जायला लागतात. त्यानंतर या व्हायरसचा तो उपाय सुचवतो व त्यातून करोडो डॉलर कमावतो. तो पुढे हाच व्हायरस भारतात व तेही खास मुंबईत पाठवतो. त्या ठिकाणीही असेच लोकांचे बळी जायला लागतात.

मात्र या विवेकला ऑर्डर देण्यापेक्षा रोहित मेहरा क्रिशच्या साहाय्याने या व्हायरसचा नायनाट करणारं औषध तयार करतात व त्यानंतर मुंबईतल्या लोकांचे प्राण वाचतात. यावर समस्त मुंबईकर या क्रिशचा एक पुतळा उभारतात व त्याच्याभोवती नाचगाणी गातात. (ते या पुतळ्याची मिरवणूक का काढत नाहीत?) तर असो, त्यानंतर मध्यांतर होतं. पुढे अनेक घडामोडी घडत राहतात. त्यातून अनेक फालतू रहस्य उलगडतात व एकदाचा हा चित्रपट संपतो.

सुपरमॅन, स्पायडर मॅन व गेला बाजार क्रिशच्या तुलनेतही हा चित्रपट कुठेही बसत नाही. यात दाखवण्यात आलेले स्टंट सोडले तर इतर कथानकात काहीही नावीन्य नाही. त्याचबरोबर एकमेकांशी संबंध जोडण्याच्या नादात इतकी तकलादू कारणमीमांसा करण्यात आलीय की, त्यातही प्रेक्षकांचं डोकं उठावं. चित्रपटाच्या कथानकात काही नावीन्य असेल अशी अपेक्षा होती तीही फोल ठरली आहे. आपल्याला काही ना काही भव्यदिव्य पाहता येईल, याचीही काही आशा नाही.

चित्रपटात केवळ हृतिकला नाचता यावं यासाठी घालण्यात आलेली गाणी कथानकाच्या जवळपासही जात नाहीत. या गीतांच्या चालीतही कोणतंही नावीन्य नाही. आपण हा क्रिश चित्रपटाचा सिक्वेल पाहतोय की त्या चित्रपटातल्या उरलेल्या तुकडय़ांचा चित्रपट पाहतोय हे लक्षात येत नाही.

राकेश रोशनला आपल्या मुलाचा वापर करून एक जबरदस्त कलाकृती निर्माण करता आली असती. मात्र या चित्रपटात हृतिकला अक्षरश: वाया घालवण्यात आलंय. आधुनिक तंत्रज्ञान व भारतीय संस्कृतीचा एक अनोखा मिलाफ आपण ‘रोबोट’ या रजनीकांतच्या चित्रपटात पाहिला होता. ते कथानक काल्पनिक होतं, तरीही त्याने प्रेक्षकांना अक्षरश: खुर्चीला खिळवून ठेवलं होतं. क्रिशच्या पहिल्या भागातही सुरुवातीला ग्रामीण व नंतरचा शहरी क्रिश प्रेक्षकांना भावला होता. या चित्रपटात मात्र भावण्यासारखं काहीही नाही. अनेक वेळा इतके रटाळ प्रसंग पेरण्यात आलेत की झोप यावी.

चित्रपटातली पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे या चित्रपटातले स्पेशल इफेक्ट. ते एका बाजूला हॉलिवुडच्या जवळ जाणारे आहेत. मात्र त्याचे जे ग्राऊंड शॉट (स्पेशल इफेक्टला जोडणारे चित्रित प्रसंग) असतात, त्या ठिकाणी खास हिंदी चित्रपट दिसून येतो. उदाहरणार्थ, एका इमारतीच्या ढिगा-याखाली क्रिश अडकलेला दिसतो. हा ढिगारा जेव्हा हटवला जात असतो तेव्हा हा ढिगारा स्पंजपासून तयार करण्यात आल्याचं अगदी स्पष्ट दिसून येतं. मुंबईत जेव्हा असाध्य रोगाची साथ आल्याचा प्रसंग दाखवण्यात आलाय तेव्हा मुंबईत केवळ खासगी रुग्णालयांमध्येच उपचार होताना दिसतात. मुंबईतल्या काही प्रसंगांतही दाखवण्यात आलेले रस्ते हे परदेशातले आहेत हे कुणी लहान मुलगाही सांगेल. अशा प्रकारचे रस्ते मुंबईत येण्यासाठी क्रिशचा विसावा भाग यावा लागेल. अशा प्रकारच्या अनेक अतार्किक अशा घटनांनी भरलेला हा चित्रपट पाहण्यापेक्षा घरी दिवाळीच्या टिकल्या फोडत बसलो तरी अधिक मनोरंजन होईल.

चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असतो तो अभिनयाचा. कोणत्याही सायन्स फिक्शन किंवा प्रचंड मारधाड असलेल्या चित्रपटातही भावनांचा ओलावा असावाच लागतो. शेवटी चित्रपटातून या भावनाच समोर येत असतात. या भावना समोर आणण्याची जबाबदारी ही अभिनेत्यांची असते. हृतिकने आपल्यावरची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. तरुण क्रिशच्या बरोबरीनेच वृद्ध रोहित मेहराची भूमिकाही त्याने जबरदस्त केली आहे. या दोन्ही भूमिकांमध्ये त्याने इतका फरक दाखवलाय की कधी कधी हे दोन वेगळे अभिनेते आहेत की काय, अशी शंका निर्माण व्हावी. मात्र त्याच्या या प्रयत्नांना कथानकाचीच साथ नसल्याने त्याचे प्रयत्न वाया गेलेत.

प्रियांकानेही आपली भूमिका तितकीच चांगली केली आहे. एका वेळेस दोन दोन भूमिका करण्याचं तिचं कसब वाखाणण्याजोगं आहे. तीच गोष्ट कंगना रनौतची आहे. तिनेही आपल्यावरची जबाबदारी चांगल्याच जबाबदारीने पार पाडली आहे. विवेक ओबेरॉयने खलनायक साकारताना अनेक नव्या गोष्टी करण्याचा केलेला प्रयत्नही वाखाणण्याजोगा आहे. त्याने ही भूमिका करताना त्याच्या पात्राचे अधिक बारकावे दाखवले असते तर फार बरं झालं असतं. इतर भूमिकांमध्ये राजपाल यादवने थोडीफार मजा आणली आहे. मात्र नंतर तो कुठे गेला हे कुणालाच कळत नाही.

ज्या प्रकारे तो मध्येच कुठे तरी गायब होतो तशाच प्रकारे अनेक घटना व अनेक पात्रं अशीच मध्येच कुठे तरी जातात तरी किंवा येतात तरी. शेवटी एका सकारात्मक अशा वळणावर हा चित्रपट संपतो व आपण सुटकेचा निश्वास टाकतो. हा चित्रपट ऐन दिवाळीत प्रदर्शित झाला आहे. त्याच्याबरोबर इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे हा चित्रपट व्यवसाय करणार, तसा तो करण्याची त्याला गरजही नाही, कारण या चित्रपटातच इतक्या जाहिराती आहेत की, हा एक प्रदीर्घ असा जाहिरातपट वाटावा. या चित्रपटाच्या व्यावसायिक यशामुळे तो विकाऊ जरी असला तरी पाहण्याच्या दृष्टीने तो एक पकाऊ चित्रपट झालेला आहे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. movie evdhi pan pakau nahi aahe movie madhe khup chan action aani graphics dile aahet. jyana knowledge kami asel tyanchyasthi hi movie pakau asel jayna knowledge aahe tyana hi movie khup aavdel movie evdhi kharab pan nahi aahe aata kahi lok movie kharab boltat pan tyachi thodi tarif pan karat aahe aata ithe news madhech bagha na movie kharab aahe ase dakhavtana hritik chya actingchi tarif pan karat aahe tyanchya graphics chi tarif pan karat aahe kangna chi tarif pan karat aahe mag movie madhe kharab kay aahe,movie khup chan banvali aahe rakesh rosan.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट