पहिली मुलगी झालेली असताना दुसरीही मुलगीच जन्माला आल्याने जन्मदात्या आईने अवघ्या महिनाभराच्या चिमुकलीला चुलीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये उघडकीस आला.
अमरावती- पहिली मुलगी झालेली असताना दुसरीही मुलगीच जन्माला आल्याने जन्मदात्या आईने अवघ्या महिनाभराच्या चिमुकलीला चुलीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये उघडकीस आला. यामध्ये त्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून आईला पोलिसांनी अटक केली.
निकीता वाकोडे असे या महिलेचे नाव आहे. अमरावतीमधील गौरखेडाकुंभी गावात निकीता राहत होती. पहिली मुलगी असून दुसरीही मुलगीच झाल्याने निकीता नाराज होती. अखेर रागाच्या भरात तिने अवघ्या एक महिन्याच्या चिमुरडीला घराच्या चुलीत नेऊन जाळले. त्यात या चिमुरडीचा मृत्यू झाला.
त्यानंतर निकिताने मुलीचा मृतदेह एका बॉक्समध्ये टाकून गावाजवळ असलेल्या नदीमध्ये फेकून दिला. गावातील लोकांना हा मृतदेह काही दिवसांनी आढळून आला असता त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी या महिलेला अटक केली असून गरिबीमुळे दोन मुलींचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न पडल्याने मुलीची हत्या केल्याचे निकीताने कबूल केले.
अरे त्या चिमुरडीचा हलकट ” Baap” कुठ्ये शेण खात बसला होता ?