१९४२ साली मुंबईहून लंडनसाठी निघालेले ब्रिटिश जहाज ‘एसएस सिटी काहिरा’ला शोधून काढण्यात ब्रिटिश क्रू टीमला यश आले आहे. या जहाजात शेकडो टन चांदीची नाणी सापडली आहेत.
लंडन- १९४२ साली मुंबईहून लंडनसाठी निघालेले ब्रिटिश जहाज ‘एसएस सिटी काहिरा’ला शोधून काढण्यात ब्रिटिश क्रू टीमला यश आले आहे. या जहाजात शेकडो टन चांदीची नाणी सापडली आहेत. लंडनमधील टेलिग्राफ दैनिकातील वृत्तानुसार या चांदीच्या नाण्यांची किंमत ५० मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल ३१६ कोटी रुपये इतकी आहे.
‘एसएस सिटी काहिरा’ हे जहाज अर्धे कार्गो आणि अर्धे प्रवासी जहाज होते. या जहाजाला दुस-या महायुद्धात ६ नोव्हेंबर १९४२ रोजी जर्मन पाणबुडी ‘यू-६८’ ने बुडवले होते. त्यात जहाजावरील १०४ प्रवाशांच्या मृत्यूसह जहाजात असलेली चांदीची नाणीही समुद्राच्या तळाशी गेली होती. ही नाणी ब्रिटिश सरकारच्या खजिन्यात जमा करण्यासाठी नेली जात होती.
‘डीप ओशन सर्च’ नावाने एक टीम या जहाजाचा शोध घेत होती. त्यासाठी त्यांनी समुद्राचा ५ हजार १५० मीटर खोल असलेला तळ गाठला होता. २०११ मध्ये या सर्च ऑपरेशनला सुरुवात झाली होती. त्यात या जहाजाचा मलबा सापडल्याने त्याचा शोध सुरूकरण्यात आला होता.
खराब हवामान आणि खोल समुद्रात शोध सुरू असल्यामुळे या जहाजाला शोधण्यास अनेक वर्षे लागली. मात्र अखेर गाळात फसलेले हे जहाज शोधण्यात या टीमला यश मिळाले व त्यावरच चांदीच्या नाण्यांचा हा खजिना सापडला.
Grate News,!