दिल्लीमध्ये एका आठवर्षाच्या मुलीची हत्याकरुन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे
नवी दिल्ली – दिल्लीमध्ये एका आठवर्षाच्या मुलीची हत्याकरुन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या मुलीचा मृतदेह शुक्रवारी रात्री दिल्लीच्या सीमेवरील बादली भागामध्ये सापडला. चंदन भुकान असे अरोपीचे नाव आहे.
चंदन आणि पीडीत मुलीच्या वडिलांची ओळख होती. घटनेच्या रात्री चंदन आणि त्याचे मित्र मनोज आणि नाथन मुलीच्या वडिलांसोबत मद्यपान करण्यासाठी घरी गेले होते. पण मुलीचे वडील घरी नसल्याने ते माघारी परतले, त्यावेळी चंदनने घराबाहेर कॉटवर झोपलेली मुलगी पाहिली आणि तिच्या अपहरणाचा कट रचला.
गुरुवारी रात्री १० वाजता चंदनने मुलीचे अपहरण करुन तिला घरामागील शेतात नेले त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलीने आरडाओरडा केला म्हणुन तिची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर तिच्यावर बलात्कार केला आणि मृतदेह तिथेच टाकून पळून गेला.
पोलिसांना पीडित मुलीच्या मृतदेहाजवळ एक चप्पल सापडली होती. त्यावरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली.
अरे याला जिवंत जाळून mara रे !