मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात राहणा-या सूरजित देवनाथ या २४ वर्षीय तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
मुंबई- मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात राहणा-या सूरजित देवनाथ या २४ वर्षीय तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे मंगळवारी उघड झाले.
सूरजित हा मालवणी येथील आजमी नगर परिसरात राहत होता. पाच सहा दिवसांपूर्वी त्याला ताप आला. तेव्हा त्याला मालवणीतील डॉक्टरांकडे नेण्यात आले होते. मात्र ताप कमी न झाल्यामुळे त्याला उपचारांसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी त्याला औषध देऊन घरी पाठवले होते. रात्री अचानक त्याची तब्येत खालावली असता, त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तेव्हा वैद्यकीय अहवालात त्याला डेंग्यू झाल्याचे सिद्ध झाले.
दरम्यान, १० दिवसांपूर्वीच मालाडच्या निधी रुग्णालयात उपचार सुरु असताना शिवानी संतोष गुप्ता या कांदिवलीमधील १८ वर्षीय मुलीचाही डेंग्यूमुळे मृत्यू झाला. मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
[EPSB]
डेंग्यूचे मूळ नारळात!
‘मलेरिया’वर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला, तरी डेंग्यूचे आव्हान महापालिकेपुढे कायम आहे.
पालिका मुख्यालयात डेंग्यूला आमंत्रण
मुंबई महापालिकेच्या वतीने मलेरियाबरोबरच डेंग्यू विरोधी मोहीम हाती घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले.
[/EPSB]
विषारी सापापेक्षा अति भयंकर हे डांस असतात हे लोकांना समजायला हवे .