आयपीएलच्या सातव्या हंगामातील क्वालिफायर २ मध्ये किंग्ज इलेवन पंजाबच्या वीरेंदर सेहवागने आपल्या मुलाला दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला.
मुंबई– बाबा, तुम्ही लवकर आउट का होता? तुम्ही धावा करत नाही म्हणून माझे मित्र मला चिडवतात, आपल्या मुलाच्या या प्रश्नावर क्रिकेटपटू वीरेंदर सेहवागने काळजी करु नकोस मी मोठी धावसंख्या करणे अशा शब्द दिला होता. तो शब्द सेहवागने शुक्रवारी आयपीएलच्या ‘क्वालिफायर २’ मध्ये झालेल्या सामन्यात पूर्ण करून दाखवला.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात सेहवागने आपला जुना आवतार दाखवला. त्याने केवळ ५८ चेंडूत १२२ धावांची खेळी केली. त्याच्या या वादळी खेळीमुळेच पंजाबने प्रथमच आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सेहवागने ही खेळी त्याच्यासाठी किती महत्त्वाची होती याबद्दल सांगितले. एके दिवशी माझ्या पत्नीने मला फोन केला आणि फोन मुलाकडे दिला. त्याने तुम्ही धावा करत नसल्यामुळे शाळेत माझे मित्र मला चिडवतात अशी तक्रार केली. त्यावेळी मी त्याला धावा करणार असल्याचा शब्द दिल्याचे सेहवाग म्हणाला. संघासाठी महत्त्वाच्या सामन्यात ही खेळी केल्यामुळे आनंद झाल्याचे तसेच आपल्या मुलाला दिलेला शब्द पूर्ण केल्याचे सेहवागने यावेळी सांगितले.
सेहवागने या खेळीत आठ षटकार आणि १२ चौकार मारले होते. आयपीएलच्या या पर्वातील हे दुसरेच शतक आहे. त्याच्या शंभर धावांमध्ये ७६ धावा या चौकार आणि षटकारांच्या होत्या. इतक नव्हे तर यंदाच्या हंगामातील हे सर्वात वेगवान शतक ठरले आहे.
Why does this have to be the ONLY reillbae source? Oh well, gj!