अमेरिका रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची स्तुती केली असून भारताबद्दल कोणी चांगले बोलत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकन रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची स्तुती केली असून भारताबद्दल कोणी चांगले बोलत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे म्हटले.
ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे भविष्यातील अध्यक्षपदाचे आघाडीचे नेते आहेत. याआधी त्यांनी अमेरिकेमध्ये मुस्लिमांनी प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर ते चर्चेत आले.
आता ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख केला आहे. ‘भारत चांगले काम करत आहे. त्यांना चांगले यश मिळत आहे. मात्र, त्यांच्या चांगल्या कामगिरीविषयी कोणच बोलत नाही, असे त्यांनी सांगितले.
टॅम्प यांनी यावेळी सांगितले की, ‘याआधी चीनविषयी सर्वजण बोलत होते. त्यांच्या कामगिरीची चर्चा सर्वत्र होत होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे, आता भारताने चांगली सुरूवात केली आहे.’
ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भारताची स्तुती केली आहे. चीन, मेक्सिको आणि जपानबद्दल ते नेहमीच बोलत असतात.
‘अमेरिकेची सर्व स्तरातून स्तुती होत होती. मात्र, अमेरिकेची सध्य स्थिती पहाता जगभरात अमेरिकेची चेष्टा होताना पहायला मिळत आहे. ही खूप दुःखद बाब असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
मि. ट्रंप आगे बढो, भारत को आप जैसे अमेरिकन दोस्त कि जरुरत है. बेस्ट ऑफ लक…