जगात कुठेही मराठी भाषेतील ५०० पुस्तके आता ऑनलाईन वाचायला मिळणार आहेत.
ठाणे- जगात कुठेही वेबसाइटवर मराठी पुस्तक वाचण्यासाठी ठाण्यातील विद्या प्रसाकर मंडळाने डिजिटल मराठी पुस्तके आणली आहेत. मराठी भाषेतील ५०० पुस्तके आता ऑनलाईन वाचायला मिळणार आहेत. या पुस्तकांच्या डिजीटायझेशनसाठी ठाण्यातील विद्या प्रसाकर मंडळाने एक सॉफ्टवेअरही विकसित केल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी सांगितले.
दुर्मिळ आणि ऐतिहासिक पुस्तके जतन केली जावीत, ती सहज वाचायला उपलब्ध व्हावी आणि या साहित्याचे संवर्धन चांगल्या प्रकारे व्हावे या उद्देशाने मंडळाने मागिल पाच वर्षे मेहनत आणि संशोधन करुन मराठी भाषा वाचकांसाठी डिजिटल पुस्तके उपलब्ध केली आहेत.
आजमितीस १८४४ ते १९३० या काळातील २६५ पुस्तकांचे डिजिटल पुस्तकात रुपांतर केले आहे. एक ऑगस्टपर्यंत ५०० मराठी पुस्तके इलेक्ट्रॉनिक फॉरम२टमध्ये उपलब्ध करणार असल्याचे बेडेकर यांनी सांगितले.
त्यासाठी मंडळाचे स्वत:चे संकेतस्थळ आहे. मंडळाने ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि अन्य जिल्ह्यातील सुमारे २० संग्रहालयांशी संपर्क साधला. एखादे दुर्मिळ पुस्तक कोणत्या ग्रंथालयात मिळू शकेल, एखादा संदर्भग्रंथ कोणत्या ग्रंथालयात उपलब्ध आहे, आदी माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाने www.granthalaya.org या संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे. या उपक्रमाचा फायदा वाचक, संशोधक, विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी सांगितले.
सध्या या संकेतस्थळावर ठाणे, मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर येथील २० ग्रंथालयांतील आठ लाख पुस्तकांची सूची उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. आपल्याला हव्या असलेल्या पुस्तकाचे नाव टाइप केल्यास, पुस्तकाच्या प्रकाशकाचे नाव, पुस्तकाची आवृत्ती, तसेच ते पुस्तक एखाद्या ग्रंथालयात उपलब्ध आहे की नाही याबाबतची अद्यावत माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच ३०० दुर्मिळ पुस्तकांचा खजिनाही www.vpmthane.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. यात काही संस्कृत ग्रंथाचांही समावेश आहे. १ ऑगस्टपर्यंत यात आणखी २०० ग्रंथांची भर पडेल, अशी माहिती डॉ. बेडेकर यांनी दिली.
छान माहिती…