भिवंडी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि गलिच्छ वस्ती सुधार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी मंगळवारी निवडणूक झाली.
भिवंडी – महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि गलिच्छ वस्ती सुधार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी मंगळवारी निवडणूक झाली.
या निवडणुकीत महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सुनीता यशवंत टावरे, तर उपसभापतीपदी शबनम मेहबूब रेहमान अन्सारी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर गलिच्छ वस्ती सुधार समितीच्या सभापतीपदासाठी विकास निकम आणि सुजाता जगताप यांच्यात सरळ लढत झाली होती. मात्र विकास निकम यांना आठ मते मिळाल्याने त्यांची निवड झाली आहे. उपसभापतीपदासाठी मेहरुन्निसा उस्मानगनी अन्सारी आणि साजिद हुसन अन्सारी यांच्यात निवडणूक झाली. या अटीतटीच्या लढतीत मेहरुन्निसा अन्सारी यांची गलिच्छ वस्ती सुधार समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. महिला व बालकल्याण समिती आणि गलिच्छ वस्ती सुधार समितीच्या सभापती, उपसभापतींची निवड मागील १० महिने वादात सापडली होती.
So excited I found this article as it made things much qukcrei!