महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेतर्फे राज्यभरात १९ ते २७ जानेवारीदरम्यान महा पक्षीगणना करण्यात येणार आहे. या गणनेत पक्ष्यांच्या जाती, प्रकार, संख्या मोजण्यात येणार आहेत.
मुंबई – महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेतर्फे राज्यभरात १९ ते २७ जानेवारीदरम्यान महा पक्षीगणना करण्यात येणार आहे. या गणनेत पक्ष्यांच्या जाती, प्रकार, संख्या मोजण्यात येणार आहेत. या गणनेच्या आधारे मिळणा-या माहितीनुसार संकटग्रस्त पक्षी, प्रजातींच्या रक्षणासाठी आवश्यक उपक्रम राबवण्यात येतील. महापक्षी गणनेचे हे चौथे वर्ष आहे.
या पक्षीगणनेसाठी पक्षीनिरीक्षक, तज्ज्ञांबरोबरच विद्यार्थी, निवृत्त, गृहिणी यांनाही आपल्या वेळा सांभाळून सहभागी होता येईल. या गणनेसाठी इच्छुकांनी आपल्या परिसरातील वेगवेगळे अधिवास तसेच जंगलांना प्राधान्य द्यायचे आहे. गणनेसाठी सकाळी साडेसहा ते दहा आणि संध्याकाळी चार ते साडेसात या वेळा योग्य आहेत.
निवडलेल्या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी गणना करावी. पाण्यातील, जमिनीवरील, झाडाझुडपांतील आणि आकाशात उडणा-या सर्व पक्ष्यांचा गणनेत समावेश करावा. पक्ष्यांची संख्या नेमकी असावी. ज्या पक्ष्याची ओळख खात्रीपूर्वक झाली आहे, अशा पक्ष्यांचाच नोंदीत समावेश करण्याचे आवाहन पक्षिमित्र संघटनेने केले आहे.
पक्षी गणना करताना घ्यायची काळजी
समूहाची गणना करताना कुकी कटिंग पद्धत वापरावी. कुकी कटिंग म्हणजे पक्ष्यांचा थवा असलेल्या ठिकाणावर एक लहान वर्तुळाकार क्षेत्र निश्चित करून त्यातील पक्षी मोजावेत. अशी किती वर्तुळे पक्ष्यांचा संपूर्ण समूह व्यापण्यासाठी लागतील याचा अंदाज घेऊन संख्या काढावी.
दोन वेगवेगळ्या गटाने एकाच ठिकाणी काम
करू नये.
घरटी करताना पक्षी आढळल्यास त्यांची नोंद
ए-घरटे बांधत असेल तर, बी-अंडी उबवत
असेल तर, सी-पिलांना भरवत असेल तर, अशाप्रकारे करावी.
गणनेची माहिती संस्थेने उपलब्ध केलेल्या
अर्जात भरून ५ फेब्रुवारीपर्यंत www.pakshiganana@gmail.com ईमेलवर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
I would like to join mahapakshiganana.
Nice
Mala aavdel pakshiganana karayla