बाळाच्या डायपर आणि टॉवेलमध्ये तब्बल १६ किलो सोने लपवून आणताना सूरत येथील दोन जोडप्यांना नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली.
नवी दिल्ली- बाळाच्या डायपर आणि टॉवेलमध्ये तब्बल १६ किलो सोने लपवून आणताना सूरत येथील दोन जोडप्यांना नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
दुबई येथून ही दोन जोडपी परतत असताना विमानतळावर त्यांची झडती घेण्यात आली, यावेळी त्यांच्याकडे हे सोने आढळल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात आली.
सोमवारी सकाळी ७ वाजता दिल्लीत उतरलेल्या विमानाने हे चार जण त्यांच्या दोन बाळांसह दुबईहून आले. सुरक्षा तपासणीदरम्यान त्यांच्या बाळांच्या डायपर्स आणि टॉवेल्समध्ये प्रत्येकी १ किलो वजनाची १६ सोन्याची बिस्कीटे ठेवण्यात आल्याचे आढळले.
यानंतर कस्टम अधिका-यांनी त्यांना अटक केली असून याप्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. या जोडप्यांची नावे मात्र कस्टमने जाहीर केलेली नाहीत.
एकदम बिनडोक हि जोडपी निघालीत,