महाड औद्योगिक वसाहतीतील एम्बायो कंपनीत रविवारी पहाटे जोरदार स्फोट झाला.
महाड – महाड औद्योगिक वसाहतीतील एम्बायो कंपनीत रविवारी पहाटे जोरदार स्फोट झाला. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की, यामुळे घटनास्थळावरील आरसीसी इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तर कारखान्यातील अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
कंपनीशेजारी असलेल्या खैरे शेलटोली गावात लोकांना या स्फोटाचे हादरे जाणवले. या स्फोटात कंपनीत काम करणारे सहा कामगार जखमी झाले आहेत. तर गणेश बबन कांबळे (२४) या कामगाराचा मृत्यू झाला आहे.
महाड एमआयडीसीतील एम्बायो या रासायनिक कारखान्यात रविवारी पहाटे हा भयंकर स्फोट झाला. कारखान्यातील एमपीपी-२ या प्लांटमध्ये हा स्फोट झाल्याचे कंपनी सूत्रांनी सांगितले. या स्फोटाने इमारतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. स्फोटामुळे इमारतीचे विटांचे आणि पत्र्याचे तुकडे या परिसरात उडाल्याने समोरील इमारतीच्या खिडक्यादेखील तुटल्या. या स्फोटाचा हादरा शेजारच्या खैरे-शेलटोली गावाला जाणवला.
स्फोटाच्या धडाक्याने स्थानिक ग्रामस्थांची झोप उडाली. आवाजाने संपूर्ण परिसर जागा झाल्याने ही वार्ता तात्काळ सर्वत्र पसरली. दरम्यान, महाड औद्योगिक वसाहत, महाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेतली. कंपनीच्या कायमस्वरूपी कर्मचारी, आपत्कालीन सुरक्षा दल, सेक्टी अधिका-यांनी तात्काळ जखमींना कंपनीबाहेर काढले. तूर्तास कपंनीचे कामकाज संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.
या स्फोटात गणेश कांबळे हा तांत्रिक साहायक मृत्युमुखी पडला आहे. गणेश जुलै महिन्यातच या ठिकाणी कामाला लागला होता. तर गणेश बोबडे, दिलीप पवार, नारायण दवंडे, दीपक कदम, अभिजीत वराळे, सखाराम पवार हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर महाडमधील देशमुख नìसग होममध्ये उपचार सुरू आहेत.
सुरक्षेचा कमकरता या अपघाताला कारणीभूत आहे.जागतिक पातळीवर हा रासायनिक कारखाना सर्दी वरचा औषध बनवतो.पण ते बनवताना पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही.याला अधिकारी वर्ग आणि कामगार वर्ग हे दोघेही जवाबदार आहेत.